EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

EPFO Digital Life Certificate Doorstep Service IPPB: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली.
EPFO Digital Life Certificate Doorstep Service IPPB
EPFO Digital Life Certificate Doorstep Service IPPBDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

EPFO Digital Life Certificate Doorstep Service IPPB: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली. EPFO ने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली की, आता पेन्शनधारक त्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच ‘जीवन प्रमाणपत्र’ जमा करण्यासाठी ‘डोरस्टेप सर्व्हिस’चा लाभ घेऊ शकतात. पेन्शनधारकांना आता बाहेर जाण्याची अजिबात गरज नसून, घरबसल्या ही सेवा मिळवण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँककडे विनंती करता येणार आहे.

पेन्शनधारकांसाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन किंवा बँक शाखेत जाऊन वार्षिक जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे. ही सेवा वेळेत पूर्ण व्हावी यासाठी EPFO ने टपाल विभागाला अधिकृत केले.

EPFO Digital Life Certificate Doorstep Service IPPB
EPFO Advance New Rules: आजारपण, लग्न, शिक्षण अन् घरासाठी PF काढण्याचे नियम बदलले; किती वेळा आणि किती पैसे काढता येणार?

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आपल्या विस्तृत नेटवर्कचा वापर करुन ही सुविधा पेन्शनधारकांच्या घरापर्यंत पोहोचवत आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पेन्शनधारक 033-22029000 या क्रमांकावर कॉल करुन पोस्टमनला आपल्या घरी येण्याची विनंती करु शकतात. विशेष म्हणजे ही सेवा IPPB चे ग्राहक नसलेल्या नागरिकांसाठीही उपलब्ध आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरद्वारे थेट पेन्शनधारकाला एक ‘प्रमाण आयडी’ पाठवला जातो.

EPFO Digital Life Certificate Doorstep Service IPPB
EPFO UPI Withdrawal: खूशखबर! आता गुगल पे आणि फोनपेवरुन काढता येणार पीएफचे पैसे, डिसेंबरपासून लागू होणार नवीन नियम?

या आयडीच्या साहाय्याने पेन्शनधारक जीवन प्रमाणाच्या अधिकृत पोर्टलवरुन आपले डिजिटल सर्टिफिकेट डाऊनलोड करु शकतात. या प्रक्रियेसाठी 70 रुपये (जीएसटीसह) इतके नाममात्र शुल्क आकारले जाईल आणि कोणताही अतिरिक्त डोरस्टेप चार्ज घेतला जाणार नाही.

EPFO Digital Life Certificate Doorstep Service IPPB
EPFO New Portal: EPFO कडून खुशखबर! नवे ई-पोर्टल सुरू; आता जुना PF काही मिनिटांत नव्या खात्यात ट्रान्सफर होणार

हे प्रमाणपत्र पेन्शनधारक (Pensioners) हयात असल्याचा पुरावा मानले जाते, ज्यामुळे त्यांची पेन्शन विनाअडथळा सुरु राहते. मात्र, केवळ प्रमाणपत्र जनरेट झाले म्हणजे ते मंजूर झाले असे नाही. त्यामुळे पेन्शनधारकांनी जीवन प्रमाण पोर्टलवर जाऊन आपल्या ‘प्रमाण आयडी’द्वारे प्रमाणपत्राची स्थिती नक्की तपासून घ्यावी. जर अर्ज नाकारला गेला किंवा काही अडचण असल्यास तात्काळ संबंधित बँक किंवा पेन्शन प्राधिकरणाशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com