Calangute Tourist Dainik Gomantak
गोवा

Calangute Entry Tax: कळंगुटमध्ये येणाऱ्या पर्यटकांना लागणार कर; वाहनांसाठी चेकपोस्टही उभारणार

Calangute Entry Tax: या चेकपोस्टच्या माध्यमातून जे पर्यटक कळंगुटमध्ये येतात, त्यांच्या वाहनांची पडताळणी करता येईल.

गोमन्तक डिजिटल टीम

Calangute Entry Tax

हल्ली पर्यटक स्वत:च्या वाहनांमधून येतात आणि किनाऱ्यांवर कुठेही बसून मद्यपान करतात. त्याच दारूच्या बाटल्या किंवा कचरा उघड्यावर फेकतात. अशा उपद्रवकारी पर्यटकांवर अंकुश ठेवण्याकरिता कळंगुट पंचायतीने गावात प्रवेश करणाऱ्या पर्यटकांवर कर लावण्याचा विचार चालविला आहे.

त्यासाठी पंचायतीने बैठकीत घेतलेल्या ठरावाचा प्रस्ताव उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला आहे. पंचायतीने कळंगुट हद्दीत प्रवेश करणाऱ्या पाच ठिकाणी चेकपोस्ट उभारण्याची मागणी केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, ७ जून २०२४ रोजी कळंगुट पंचायतीने बैठकीत हा ठराव घेतला. महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे असाच कर आकारला जात असल्याचा संदर्भ देत कळंगुट पंचायतीने जिल्हाधिकारी, पोलिस प्रमुख व सरकारकडे, पोलिस आणि पंचायत कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने गावातील प्रवेशद्वारांवर चेक पोस्ट उभारण्यासाठी परवानगी मागितली आहे.

या चेकपोस्टच्या माध्यमातून जे पर्यटक कळंगुटमध्ये येतात, त्यांच्या वाहनांची पडताळणी करता येईल. यासाठी कळंगुट गावात प्रवेश करण्याच्या पाच रस्त्यांवर चेकपोस्ट उभारणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला आहे.

पंचायतीकडे पर्यटकांच्या उपद्रवासंदर्भात अनेक तक्रारी येतात. अनेकजण गैरप्रकारांत गुंततात. यातून गावाची बदनामी होते. त्यामुळेच पंचायत बैठकीमध्ये प्रस्ताव घेऊन तो जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला आहे. पर्यटकांच्या पडताळणीसाठी चेकपोस्ट उभारण्यासह रस्ता प्रवासी कर किंवा प्रवेश शुल्क आकारण्याचा प्रस्ताव आहे.

- जोसेफ सिक्वेरा, सरपंच, कळंगुट.

नाक्यांसाठीची ठिकाणे

जिथून पर्यटकांची वाहने पंचायत क्षेत्रात प्रवेश करतात, ती पाच ठिकाणे पंचायतीने निश्‍चित केली आहेत. कळंगुट-साळगाव सीमेलगत पेट्रोल पंपजवळ, कळंगुट-हडफडे हद्दीजवळील रिसॉर्टजवळ, फॅट फिश रेस्टॉरंट आगरवाडा, बागा बीच रिव्हरसाईड रेस्टॉरंट आणि कळंगुट-कांदोळी पंचायतीची हद्द याठिकाणी चेकपोस्ट उभारण्याचा प्रस्ताव आहे. तो जिल्हाधिकाऱ्यांना पाठविल्याची माहिती सिक्वेरा यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT