Goa News: ‘क्रिमीलेयर’बाबत तोडगा काढणार; उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांचे आश्‍‍वासन

Goa News: दोन दिवसांत समाजकल्याण खाते, ओबीसी आयोग व सर्व उपजिल्हाधिकाऱ्यांची बैठक
Goa News Creamy layer
Goa News Creamy layer Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: क्रिमीलेयर ओबीसी घोळावर तोडगा काढण्यासाठी येत्या दोन दिवसांत समाजकल्याण खाते ओबीसी आयोग व सर्व उपजिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे आश्‍‍वासन उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांनी आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळाला दिले.‌

ओबीसी दाखल्यासाठी पालकांचे वेतन विचारात घेऊ नये असे न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिलेले असताना काही तालुक्यांतील उपजिल्हाधिकाऱ्यांनी पालकांचे वेतन जमेस धरून विद्यार्थी क्रिमीलेयरात येत असल्याचा दाखला दिला आहे.

पेडणे व बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून हा दाखला दिला आहे. त्यामुळे व्यावसायिक महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे‌ नुकसान होण्याची भीती व्यक्त करून या प्रकरणी सर्वमान्य तोडगा काढण्याची विनंती करणारे निवेदन राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आज उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

Goa News Creamy layer
Panjim: अंधारात होते पाप! 'स्मार्ट पणजी'साठी 200 वर्ष जुन्या झाडाची रात्रीच्या वेळेस कत्तल

दरम्‍यान, येत्या दोन दिवसांत बैठक घेण्याचे आश्‍‍वासन श्रीमती गीते यांनी दिले. या शिष्टमंडळात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष मधू नाईक, अॅड. पराग वेळुसकर, गुरुदास सावळ व प्रमोद कारापूरकर यांचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ghrdc Employee Salary Hike
Goa Drug Racket Bust
North Goa Milk Farmers Demand Price
Goa Cabinet Decision Medical Education
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com