Calangute Beach | Dev Babareshwar Jatra  Dainik Gomantak
गोवा

Calangute Beach: कळंगुटमधील बाबरेश्वर जत्रेस केळींची जत्रा असे का म्हणतात, घ्या जाणून...

नवस पुर्ण झाल्यावर भाविक देव बाबरेश्वर अर्पण करतात केळीचा घड

Akshay Nirmale

Calangute Beach: गोव्यात सध्या विविध मंदिरांच्या जत्रोत्सवाचा काळ सुरू आहे. त्याच क्रमात बार्देश तालुक्यातील कळंगुट समुद्रकिनाऱ्यावरील देव बाबरेश्वर जत्रा अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावात झाली. ही जत्रा केळींची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे.

या जत्रेत केळी या फळांना खूप महत्व आहे. जत्राकाळात मंदिराच्या छतावर केळी ठेवणं, हे या जत्रेचं वैशिष्ट्य आहे. या देवाला बोललेला नवस पूर्ण झाल्यावर भाविक देव बाबरेश्वराला केळीचा घड अर्पण करतात.

बागा-कळंगुट येथील बाबरेश्वर मंदिराच्या 59 व्या वार्षिक जत्रेत देव बाबरेश्वराची पुजा कळंगुट मतदारसंघाचे आमदार मायकल लोबो यांच्या हस्ते झाली. पुजेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले की, राज्यातील विविध धर्मियांचे सण जातीय सलोखा राखण्यास मदत करतात. गोव्यातच हे सांस्कृतिक चित्र दिसून येते. हे गोव्याचे वेगळेपण आहे.

केळी उत्सव या नावाने ओळखला जाणारी ही जत्रा सर्वधर्मियांना एकत्र आणते. सर्व लोकांना त्यांच्या धर्माचा विचार न करता एकत्र आणणारा हा सण आहे. अनेक परदेशी पर्यटकदेखील भगवान बाबरेश्‍वराच्या देवतेला नमन करण्यासाठी या मंदिराला भेट देतात.

भाविकांनी अर्पण केलेला केळीचा घड नंतर मंदिराच्या छताला बांधला जातो. काही दिवसांनी या घडांचा लिलाव केला जातो. हे मंदिर कळंगुट समुद्रकिनाऱ्यापासून अगदी जवळ आहे. कळंगुटला देशासह जगभरातील पर्यटक नियमित भेट देत असतात.

त्यामुळे या उत्सवाला जणू ग्लोबल भाविक येत असतात. त्यातून या जत्रेचा प्रसार जगभरात झाला आहे. जगभरात केळी महोत्सव म्हणून या जत्रेची ओळख आहे, अशी माहिती, मंदिराचे अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT