Goa Tourism: व्हॅलेंटाईन, कार्निव्हलच्या पार्श्वभुमीवर गोव्यात हॉटेल बुकिंग जोरात...

चांगल्या व्यावसायिकांना उलाढालीची अपेक्षा
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak

Goa Tourism: प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असलेला व्हॅलेंटाईन डे काही दिवसांवर आला आहे. त्या पार्श्वभुमीवर तसेच येत्या काळात गोव्यात होणाऱ्या कार्निव्हलसाठी पर्यटकांचा गोव्याकडे ओघ सुरू झाला आहे.

या काळात गोव्यातील अनेक हॉटेल्समध्ये बुकिंग झाल्याचे समोर येत आहे. हॉटेल्समध्ये सुमारे 80-90 % बुकिंग झाल्याचे कळते. त्यामुळे व्यावसायिकांनाही चांगल्या उलाढालीची अपेक्षा आहे.

Goa Tourism
Vijay Sardesai: गोव्याचे युवक बेरोजगार होत असताना मुख्यमंत्री 'इव्हेंट' करण्यात बिझी...

व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करण्यासाठी तरूणाईची पसंती गोव्याला असते. त्यामुळेही बुकिंगच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसते आहे. उत्तर गोव्यात नाईट लाईफचे आकर्षण पर्यटकांना असते. तसेच आकर्षण व्हॅलेंटाईन डे च्या पार्ट्यांचेही आहे. या काळात गोव्यात अनेक पार्ट्या होत असतात.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कार्निव्हलसाठी येणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे हॉटेल बुकिंगचे प्रमाण 15 ते 20 टक्क्यांनी वाढणार आहे. कोरोना महारोगराईमुळे गेल्या दोन वर्षात उत्सवांवर बरीच बंधने आली होती.

Goa Tourism
Saptakoteshwar Temple: शिवरायांनी केला जीर्णोद्धार तर वंशजांच्या हस्ते लोकार्पण, हा दुर्लभ योग!- फडणवीस

त्यामुळे यंदाचा कार्निव्हल मोठा होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय लग्न आणि इतर समारंभांमुळेही हॉटेल्सच्या बुकिंगमध्ये वाढ दिसून आली आहे.

डिसेंबर आणि जानेवारी या काळात हॉटेल बुकिंग्ज 85 ते 90 % होती. गेल्या दोन महिन्यात तारांकित हॉटेल्सप्रमाणेच छोट्या हॉटेल्सनीही चांगला व्यवसाय केला आहे. आगामी काळात हॉटेलमधील बुकिंग्ज 100 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते.

दरवर्षीच या काळात गोव्यात पर्यटकांचा ओघ वाढत असतो. त्यामुळे व्यावसायिकांसाठी हा काळ उत्तम मानला जातो. व्हॅलेंटाईन डे संस्मरणीय करण्यासाठी अनेक कपल्स गोव्याची निवड करत असतात. त्यातून यंदाही गोव्यातील हॉटेल बुकिंग्जमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभुमीवर वाढ दिसून आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com