Calangute Police Arrested Accused In Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Calangute Crime: अमली पदार्थ प्रकरणी आंध्र प्रदेशातील एकाला अटक; कळंगुट पोलिसांची कारवाई

कारवाईत तब्बल 6 लाख 10 हजार रुपयांचा 6 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

Rajat Sawant

Calangute Police Arrested Accused In Drugs Case: कळंगुट पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका संशयितावर कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 6 लाख 10 हजार रुपयांचा 6 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत संशयितावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉल्फिन सर्कल जवळ नायकावडो येथे येथे एक व्यक्ती आपल्या ग्राहकाला अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती कळंगुट पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पीएसआय विराज नाईक यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. पथकाच्या मदतीने या ठिकाणी सापळा रचून छापा टाकण्यात आला. या छाप्यात संशयित एनव्ही कृष्णा रेड्डी रा. आंध्र प्रदेश याच्याकडे 6 लाख 10 हजार रुपये किमतीचा 6 किलो 100 ग्रॅम गांजा सापडला.

संशयिताला NDPS कायदा 1985 च्या अंतर्गत अटक करण्यात आली. अमली पदार्थांचा स्रोत शोधण्यासाठी त्याची पोलीस कोठडी घेण्यात येत आहे.

पीएसआय विराज नाईक, पोलिस कॉन्स्टेबल अमीर गरड, पोलिस कॉन्स्टेबल गणपत तिलोजी आणिपोलिस कॉन्स्टेबल अक्षय कामुर्लेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पुढील तपास पीआय परेश जी नाईक आणि एसडीपीओ पर्वरी विश्वेश कर्पे यांच्या देखरेखीखाली उत्तर गोव्याचे एसपी निधीन वाल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT