गोवा ATS आणि महाराष्ट्र पोलिसांचे फोर्स वन कमांडो 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी करणार मॉक ड्रिल

सुरक्षेच्या कारणास्तव ही मॉक ड्रिल केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Goa ATS
Goa ATSDainik Gomantak
Published on
Updated on

National Games 2023 Goa: गोव्यात नियोजित 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांचे दहशतवादविरोधी पथक (ATS) आणि महाराष्ट्र पोलिसांचे फोर्स वन कमांडो क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी मॉक ड्रिल करणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव ही मॉक ड्रिल केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गोव्यात 26 ऑक्टोबरपासून 37 व्या राष्ट्रीय स्पर्धेचा शुभारंभ होत असून, विविध देशातील लोक भारतात येण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणास्तव यापूर्वीच गोव्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसारखा मोठा कार्यक्रम होत असल्याने गोवा पोलिसांचे दहशतवादविरोधी पथक (ATS) आणि महाराष्ट्र पोलिसांचे फोर्स वन कमांडो क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी मॉक ड्रिल करणार आहेत.

सध्या इस्रायल आणि हमास यांच्यात भीषण युद्ध सुरु आहे, त्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारला सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.

दरम्यान, राज्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर विविध देशातील नागरिक आणि स्पर्धक स्पर्धा पाहण्यासाठी राज्यात हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गोवा पोलिसांचे दहशतवादविरोधी पथक (ATS) आणि महाराष्ट्र पोलिसांचे फोर्स वन कमांडो क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी मॉक ड्रिल करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Water Resources Department Officers
Goa Olympic Association election
Goa Yoga Day RTI Details
Viresh Borkar Revolutionary Goans
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com