MLA Michael Lobo: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश हा भाजपसाठी आगामी लोकसभा निवडणुकीत चिंतेचा विषय ठरणार नाही, असा विश्वास कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी व्यक्त केाल.
पर्रा टॉवर ते नागोवा ड्रीम सर्कल रस्त्याच्या हॉट मिक्सिंग कामाच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. लोबो यांच्यासह उपसरपंच चंदू हरमलकर व सर्व पंच सदस्य यावेळी उपस्थित होते.
लोबो म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला कोणतीही चिंता नाही. कारण राज्याची निवडणूक आणि केंद्राची निवडणूक हे वेगळे विषय आहे. राज्यस्तरीय प्रश्नांचे प्रतिबिंब केंद्रीय निवडणुकीत पडत नाही.
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता खूप जास्त आहे. आणि लोक नरेंद्र मोदींकडेच पंतप्रधान म्हणून पाहत आहेत. देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत आहे.
हा देश युनायटेड स्टेट्स किंवा इतर देशांच्या बरोबरीने पुढे जाण्यासाठी मोदीच योग्य नेतृत्व आहेत. लोक त्याच आशेने त्यांच्याकडे पाहतात.
लोबो म्हणाले की, एखाद्या राज्याचे धोरणात्मक निर्णय चुकले की सरकार बदलते. राज्यात काही निर्णय चुकीचे ठरले असले तरी त्याचा केंद्र सरकारशी काहीही संबंध नाही. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप प्रचंड बहुमताने पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.