CEM Meeting in Goa: उर्जाविषयक 2 महत्वाच्या बैठकांचे यजमानपद गोव्याला; जुलैमध्ये 'या' दिवशी होणार बैठक

केंद्रीय उर्जा मंत्र्यांनी दिली माहिती
CEM Meeting in Goa | Power Minister R K Singh
CEM Meeting in Goa | Power Minister R K Singh Dainik Gomantak

CEM Meeting in Goa: जुलैमध्ये गोव्यात 14 वी क्लीन एनर्जी मिनिस्टरीयल मीटींग होणार आहे. हरित ऊर्जेच्या विकासाला आणि वापराला गती देण्याच्या उद्देशाने या बैठकीत मंथन होणार आहे. 8 वी मिशन इनोव्हेशन बैठक देखील गोव्यात पार पडणार आहे.

केंद्रीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांनी गुरुवारी ही माहिती दिली. दिल्लीतील 14 व्या हरित उर्जा मंत्रालयाच्या लोगो लॉंन्च कार्यक्रमात ते बोलत होते.

CEM Meeting in Goa | Power Minister R K Singh
Goa News : केरीत संरक्षक भिंत ठरतेय पांढरा हत्ती !

19 ते 22 जुलै या काळात ही बैठक गोव्यात पार पडणार आहे. एकत्रितपणे स्वच्छ उर्जेच्या विकासाला आणि वापराला प्रोत्साहन देणे, हे या बैठकीचे उद्दिष्ट आहे.

या बैठकीतून राज्ये आणि केंद्र सरकारसह या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटना, खासगी क्षेत्रातील तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, आंत्रप्रुनर, धोरणकर्त्यांना एकाच व्यासपीठावर आणले जाणार आहे. यातून हरित उर्जेबाबत मंथन केले जाणार आहे.

हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी 2009 मध्ये क्लीन एनर्जी मिनिस्ट्रियल (CEM) ची स्थापना उच्च-स्तरीय जागतिक मंच म्हणून करण्यात आली. भारत हा CEM च्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे.

फ्रान्सच्या पॅरिस येथे असलेल्या CEM सचिवालयाद्वारे CEM ला वेगवेगळ्या पातळ्यांवर पाठबळ दिले जाते.

CEM Meeting in Goa | Power Minister R K Singh
शिरशिरे - बोरी येथे तीन पिलासह बिबट्याचे दर्शन, वन खात्याचे कर्मचारी घटनास्थळी

मंत्री आर. के. सिंह म्हणाले की, " CEM हा मंच देशाला आणि जागतिक स्वच्छ ऊर्जा समुदायाला एकत्र आणतो. विविध कार्यक्रमांत सहभागी होण्याची आणि स्वच्छ ऊर्जेबाबत नावीन्यता जाणून घेण्याची संधी त्यानिमित्ताने मिळते.

दरम्यान, G20 Energy Transitions Working Group (ETWG) ची चौथी बैठकही याच काळात गोव्यात होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com