Calangute Illegal Shops Dainik Gomantak
गोवा

Calangute Raid: "परवाना कपड्यांच्या दुकानाचा, दुकान उघडलं टॅटूचं " कळंगुट किनाऱ्यावरील बेकायदा आस्थापनांवर पंचायतीचे छापे

Calangute Illegal Shops: दुकानांकडे योग्य परवाने नसल्यानेच छापे टाकण्यात आले आहेत

Akshata Chhatre

म्हापसा: कळंगुट पंचायतीने शनिवारी (दि. २८ डिसेंबर) कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर बेकायदेशीरपणे अनेक व्यवसाय चालवणाऱ्या काही दुकानांवर छापे टाकले. सरपंच जोसेफ सिक्वेरा म्हणाले की, दुकानांकडे योग्य परवाने नसल्यानेच छापे टाकण्यात आले आहेत. जागेचे मालक कपड्याच्या विक्रीसाठी परवाना घ्यायचे व त्याच परिसरात टॅटू शॉपसारखे इतर व्यवसाय देखील करायचे. मुळात त्यांना कायदेशीर व्यवसाय करायचा आहे, तर त्यांनी परवाना घेवून व्यवसाय करावा.

आज पंचायतीने बेकायदेशीर व्यवसाय करणारी सुमारे पाच दुकाने बंद केली आहेत. तसेच दुकानांसमोरील बेकायदेशीर बांधकामे हटवली आहेत. आम्ही येत्या सोमवारी संबंधित मालकांना पंचायत कार्यालयात बोलावले आहे, असेही सिक्वेरा म्हणाले.

समुद्रकिनाऱ्यावर फिरताना पर्यटकांना त्रास होऊ नये म्हणून ही मोहीम राबवण्यात आल्याचे सिक्वेरा यांनी सांगितले. अलीकडेच आमचे प्रभाग सदस्य व भागधारकांनी समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता केली. कारण पर्यटन विभाग हा परिसर स्वच्छ करण्याची तसदी घेत नाही. लोकांना समुद्रकिनाऱ्यावर आरामात चालता आले पाहिजे, असेही सिक्वेरा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT