Goa FDA Raid
FDA Dainik Gomantak

FDA Raid: 'एफडीए'चे छापेमारीचे काम सुरूच! विशेष मोहिमा स्थगिती निर्णयावरती संचालकांनी दिली माहिती

Goa FDA Raids: नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध होत असल्याचा विश्वास ठेवावा, असे आवाहन श्वेता देसाई यांनी केले. विभागाचे कर्मचारी नेहमीप्रमाणे काम करत असून कामचुकारपणा होत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
Published on

FDA Raid In Goa

पणजी: अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने सद्यःस्थितीत विशेष मोहिमा तूर्तास थांबविल्या असल्या तरी विभागाचे नियमित काम आणि छापेमारीचे काम सुरू आहे, अशी माहिती एफडीएच्या संचालक श्वेता देसाई यांनी दिली आहे.

देसाई यांनी सांगितले की, सध्या नवीन वर्षाच्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गोव्यात व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी तसेच विविध महोत्सवामध्ये अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्याचे मोठे काम एफडीएकडे आहे. त्यामुळे विभाग त्यासाठी १०० टक्के प्रयत्न करत आहे.

जुने गोव्यातील शव प्रदर्शन स्थळांवर देखील अन्न व पेय पदार्थांच्या गुणवत्तेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विभाग व्यस्त आहे. त्याआधी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, सेरेंडिपिटी आर्ट फेस्टिव्हल व इतर महोत्सवात अन्नसुरक्षा पुरविण्यात विभाग व्यस्त होता. या कारणांमुळे विशेष मोहिमा सध्या स्थगित करण्यात आल्या आहेत.

Goa FDA Raid
Goa Crime: सांकवाळ पंच सदस्यांनी मारहाण केल्याचा दावा! वेर्णा पोलिस स्थानकात अफरातफरीची परस्परविरोधी तक्रार दाखल

कामचुकारपणा नाही

विशेष मोहिमा थांबविल्या असल्या तरी विभागाच्या नियमित छापेमारी मोहिमा अखंड सुरू आहेत. यामुळे नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध होत असल्याचा विश्वास ठेवावा, असे आवाहन श्वेता देसाई यांनी केले. विभागाचे कर्मचारी नेहमीप्रमाणे काम करत असून कामचुकारपणा होत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com