Goa Police law and Order Dainik Gomantak
गोवा

कळंगुट, धारगळ, रूमडामळ तणाव आणि G20 बंदोबस्त; गोवा पोलीस स्पायडरमॅनच्या भुमिकेत?

राज्यात घडत असलेल्या घटना आणि G20 बैठकीचा बंदोबस्त यामुळे पोलिसांपुढे कायदा आणि व्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

Pramod Yadav

Goa Police law and order: गोव्यात विशेषत: उत्तर गोव्यात अलिकडे काही दिवसांत घडलेल्या सलग घटनांमुळे विविध ठिकाणी तणाव निर्माण झाला आहे. यात प्रामुख्याने कळंगुट पंचायत, रूमडामळ दवर्ली पंचायत आणि धारगळ येथे घडलेल्या विविध घटनांमुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

याशिवाय गोव्यात 19 जूनपासून G20 पर्यटन कार्यगटाची मंत्रीस्तरीय बैठक सुरू आहे. राज्यात घडत असलेल्या घटना आणि G20 बैठकीचा बंदोबस्त यामुळे पोलिसांपुढे कायदा आणि व्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

कुठे काय झाले?

कळंगुट येथे उभारण्यात आलेल्या शिवपुतळा प्रकरणी कळंगुट पंचायतीने नोटीस बजावत पुढील दहा दिवसांत पुतळा हटविण्यास सांगितले. यावरून मंगळवारी हाजारो शिवप्रेमींनी कळंगुट पंचायत येथे गोळा होत ठिय्या आंदोलन केले. माफी नाही तोवर माघार नाही अशी भूमिका घेतल्याने अखेर सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी माफी मागितली व नोटीस मागे घेतल्याचे जाहीर केले. हे प्रकरण निवळले असले तरी 20 जून रोजी गोवा पोलिसांची चांगलीच दमक्षाक झाली.

धारगळ येथे डंपरखाली येऊन एकाचा मृत्यू झाल्याने याप्रकरणी तेथील स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतली. घटना घडली त्यादिवशी स्थानिकांनी क्रेन पेटवून दिल्याने पोलिसांसमोर जमावाला शांत करण्याचे आव्हान उभे ठाकले. दरम्यान, याप्रकरणी ट्रक चालकाला अटक केली असली. तरी, यात राजकीय पक्षांनी उडी घेतली असून, कठोर कारवाईची मागणी होत आहे.

तसेच, रूमडामळ दवर्ली पंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान पंच विनायक वळवईकर यांच्यावर शनिवारी रात्री प्राणघातक हल्ला झाल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी मायणा कुडतरी पोलीसांनी आयुब खान या संशयिताला अटक केलीय. मात्र, येथील वातावरण देखील तणावग्रस्त असून, येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, याबाबत उत्तर गोवा पोलिसांनी याबाबत पोलिसांसमोरील आव्हानांबाबत एक ट्विट पोस्ट केले आहे.

"गोवा पोलिसांसाठी जून महिना खूप जड जातोय. पण सुरक्षा आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबाबत आमचा उत्साह कोणीच तोडू शकत नाही. गोव्यात येणारे पर्यटक गुंतवणूकदार यांच्यासाठी सुरक्षित वातावरण विश्वास निर्माण करण्याची आम्ही खात्री देतो." असे लिहून सोबत स्पायडरमॅन चित्रपटातील एका सीनचे चित्र पोस्ट करण्यात आले आहे.

सुरक्षा आणि कायदा व्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचे संचलन

गोवा पोलिसांनी राज्यात सुरक्षा आणि कायदा व्यवस्था राखण्यासाठी दक्षिण गोवा आणि उत्तर गोव्यात विविध ठिकाणी संचलन केले. दक्षिण गोव्यात वास्को, काणकोण, कोलवा येथे तर उत्तर गोव्यात रूमडामळ दवर्ली येथे संचलन करत सामाजविरोधी काही घटना घडणार नाही काळजी घेतली.

दरम्यान, राज्यात एवढ्या घटना घडत असताना सोबत होत असलेली G20 बैठकीचा बंदोबस्त राखण्यात गोवा पोलिसांची दमक्षाक होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने मला श्रीमंत केले; गोव्यातील प्रसिद्ध मच्छीमार 'पेले'ने सांगितला अनुभव

Goa News: मुसळधार पाऊस, अपघात; गोव्यातील दिवसभरातील महत्वाच्या बातम्या

ब्रेकअप के बाद... हृदय तुटल्यानंतर Google मधील अडीच कोटी पगाराच्या नोकरीवर मारली लाथ; सुरु केला स्वत:चा व्यवसाय

Asia Cup 2025 Schedule: आशिया कप स्पर्धेतील सामन्यांच्या वेळेत बदल, किती वाजता सुरू होणार सामना? जाणून घ्या

बायकोच्या अफेअरबाबत पतीला कळालं, डंबलने ठेचून तिने नवऱ्याला संपवलं

SCROLL FOR NEXT