Goa Agriculture : कृषी योजनांत केला जातोय जातीय भेदभाव; एसटी, ओबीसींना खतासाठी निराळ्या सवलती

शेतकरी सदानंद रायकर यांची मागणी : सरकारने किमान शेतकऱ्यांना आपल्या बागायतीत उत्पन्न घेण्यासाठी जातीनुसार वर्गवारी करून सवलत न देता सरसकट शेतकरी हिच जात समजून सर्वांना समान सवलत द्यावी
Goa Agriculture |Goa News
Goa Agriculture |Goa News Dainik Gomantak

Goa Agriculture : कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सवलती या शेतकरी म्हणून देणे आवश्यक असताना कृषी क्षेत्रातही जातीय भेदभाव का करण्यात येत आहे, असा प्रश्न मळकर्णे येथील शेतकरी सदानंद रायकर यांनी केला आहे. इतर योजनांबाबत जातीनिहाय वर्गवारी करून सवलती दिल्या जात आहेत.

त्याबद्दल कोणताही आक्षेप नसून शेती बागायतीसाठी कृषी खात्याकडून खत घेण्यासाठी ‘एसटी’साठी वेगळी सवलत तर ‘ओबीसी’ साठी वेगळी सवलत हे बरोबर नसून एकाच भूखंडात एसटी आणि ओबीसी अशा दोन घटकांनी भात शेती लावली आणि समान मशागत केली तर जास्त सवलती देणाऱ्यांच्या शेतात काय सोने उगविणार, आणि ओबीसी शेतकऱ्यांच्या शेतात लोखंड तयार होणार का,असाही प्रश्‍न रायकर यांनी केला.

Goa Agriculture |Goa News
Usagaon Scrap Yards: डेंग्यूवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचायतीची मोहीम सुरु; सरपंचांनी दिली 'ही' महत्वाची माहिती

हा भेदभाव जातीनुसार शेती बागायतीत निर्माण करून कृषी खाते काय साद्य करू पाहते. ओबीसी असल्यास नारळ, सुपारी बागायती साठी कोणतीही सवलत देण्यात येत नाही, आणि एसटी असल्यास खत खरेदीसाठी भरपूर सवलत दिली जात आहे. त्या शेतकऱ्यांप्रमाणे आम्हीही बागायतीत घाम गाळतो, मग आम्हाला खत खरेदी करण्यासाठी सवलत का दिली जात नाही.

सरकारने कृषी क्षेत्रात सुद्धा जातीभेद करून शेती बागायती नकोशा करून टाकल्या आहेत. आधीच बागायतीबद्दल परवड सुरू असताना वन्यजीव उपद्रव करतात. त्याचा मुकाबला सरकार करू शकत नाही, आणि जे शेतकरी शेती बागायती करू पाहत आहेत, त्यांना वाईट अनुभव दिला जात आहे,अशी टीका सदानंद रायकर यांनी केली आहे.

Goa Agriculture |Goa News
Goa Crime News: लाचखोरीप्रकरणी निवृत्त अधिकाऱ्यास तुरुंगवास

शेतकरी म्हणूनच सवलत द्या !

सरकारने किमान शेतकऱ्यांना आपल्या बागायतीत उत्पन्न घेण्यासाठी जातीनुसार वर्गवारी करून सवलत न देता सरसकट शेतकरी हिच जात समजून सर्वांना समान सवलत द्यावी. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रकारात लक्ष घालून शेतकरी बांधवांवर होणारा अन्याय दूर करावा,अशी मागणी रायकर यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com