CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Calangute: कळंगुटचा विकास सर्वाधिक नजरेसमोर! मुख्यमंत्र्यांकडून लोबोचे कौतुक; योग्य ती दखल घेण्याचे दिले सूचक आश्वासन

CM Pramod Sawant: कळंगुट भाजप मंडळ तसेच इतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते.

Sameer Panditrao

कळंगुट: राज्यातील चाळीसही मतदारसंघांपैकी कळंगुटचा विकास सर्वाधिक नजरेसमोर दिसतो आहे, आमदार मायकल लोबो स्पष्टवक्ते आहेत. आपल्याला खटकलेली कुठलीही गोष्ट ते सडेतोडपणे व्यक्त करतात. त्यांच्या कार्याची पक्षाकडून योग्यवेळी योग्य ती दखल घेतली जाईल,असे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी कळंगुटमध्ये सांगितले.

कळंगुट भाजप मंडळ तसेच इतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, कळंगुटचे आमदार मायकल लोबो, कळंगुट भाजप मंडळाचे अध्यक्ष समीर चोडणकर, तसेच इतर पदाधिकारी तसेच भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपचे सरकार धर्म -जातीवरून नव्हे तर लोकहिताचा विचार करून विकासाची कामे करीत आहेत, आणि म्हणूनच राज्यातील जनतेने २०१२ पासून भाजपच्या हाती सत्तेची सूत्रे सोपवली असून सतत भाजपलाच सत्तेत ठेवले आहे.

दामू नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष

भाजपसाठी तळागाळातील कार्यकर्ताही तितकाच महत्त्वाचा असल्याने कुठल्याही प्रकारचा भेदभाव अथवा मतभेद न मानता स्वताला पक्ष कार्यासाठी झोकून द्या.

मायकल लोबो, आमदार

कळंगुटचा चौफेर विकास हाच ध्यास ठेवून आपण राजकारण करीत असून विकासाआड येणारी कुठलीही गोष्ट सहन केली नाही. कळंगुट मतदारसंघातील कळंगुट, कांदोळी, नागवा-हडफडें तसेच पर्रा पंचायतींशी माझे सलोख्याचे नाते आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: जो खिलाफ है मेरे मैं उनके विरुद्ध तो नही, पर हाँ... प्रदर्शन करणाऱ्या महिलेसमोर उभा ठाकला तिचाच पोलिस पती; पाहा सुंदर व्हिडिओ

North Goa: सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, धूम्रपान करणाऱ्यांची खैर नाही! 66 जणांना ठोकल्या बेड्या; उत्तर गोव्यात पोलिसांची मोठी कारवाई

Viral Video: प्रवाशांच्या जीवाशी खेळ! एसी डब्यात सिगारेट ओढणाऱ्या तरुणीचा हंगामा; प्रवाशांनी विरोध करताच सुरु झाली बाचाबाची

Duleep Trophy 2025 Final: 11 वर्षांनंतर सेंट्रल झोनच्या झोळीत दुलीप ट्रॉफी, अंतिम सामन्यात दक्षिण विभागाचा 6 विकेट्सने पराभव

"99 प्रॉब्लेम्स आहेत, पण नवऱ्याची कटकट नाही", दक्षिणी अभिनेत्रीचे डिवोर्स फोटोशूट; नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT