Calangute Crime: मध्यप्रदेशातील महिलेच्या खून प्रकरणी नवी अपडेट! दिल्लीतील दोघेजण ताब्यात; कळंगुट पोलिसांनी दिली माहिती

Calangute Murder Case: कळंगुट येथील राज हॉटेलमध्ये उतरलेल्या भावना तोमर (३९) या मध्यप्रदेश येथील महिलेचा खून प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

कळंगुट: खोब्रावाडा-कळंगुट येथील राज हॉटेलमध्ये उतरलेल्या भावना तोमर (३९) या मध्यप्रदेश येथील महिलेचा खून प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांना लवकरच गोव्यात आणले जाईल, अशी माहिती कळंगुटचे पोलिस निरीक्षक परेश नाईक यांनी दिली.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भावना तोमर या खोब्रावाडा- कळंगुट येथील राज हॉटेलमध्ये उतरल्या होत्या. १५ मार्चला रोजी तोमर यांचा खून झाल्याची तक्रार राज हॉटेलचे व्यवस्थापक अब्दुल झाहिर सरकार (पश्चिम बंगाल) यांच्याकडून कळंगुट पोलिसांत दाखल करण्यात आली होती.

कळंगुट पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत तपास सुरू होता. दरम्यान, १६ मार्चला एक पुरुष व एक मास्कधारी महिला राज हॉटेलमधील खोली क्र. १ मध्ये प्रवेश करतानाचे दृश्य तेथील सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यानुसार पोलिसांनी तपासाला गती देत दिल्ली तसेच मध्यप्रदेश पोलिसांना याची माहिती पुरवली होती.

Goa Crime News
Calangute Murder Case: अपघात की घातपात? कळंगुट येथे हॉटेलमध्ये आढळला मध्यप्रदेशच्या महिलेचा मृतदेह

दरम्यान, शनिवारी संध्याकाळी या खुनातील प्रमुख संशयित राहुल राकेश महेश्र्वरी (४०) याच्या दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून संशयित रश्मी सुरेंद्र सोळंकी (३८) हिच्याही मुसकया आवळण्यात आल्या. सध्या दोन्ही संशयित दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहेत. लवकरच कळंगुट पोलिस दिल्लीला जाणार आहेत.

Goa Crime News
Calangute Crime: मुंबईतून गोव्यात आली, सकाळी हॉटेलमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; खूनाचा संशय

मध्यप्रदेशातील खंडवा येथील ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह गोव्यातील कळंगुट येथील राजहंस हॉटेलमध्ये आढळला होता. गोवा पोलिसांनी खुनाचा संशय व्यक्त करत त्या दृष्टीने तपास सुरु केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Guwahati Crime News
Goa knife attack
Brother Shoots Two Sisters In Roorkee
Goa Uncle Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com