Caculo Mall Dainik Gomantak
गोवा

Caculo Mall : काकुलो मॉलसमोरील टप्पा पावसाळ्यात होणार पूर्ण ?; वेलपॉईंट सिस्टीमचा वापर

Caculo Mall : तीनशे मीटर अंतराच्या या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सांतिनेज परिसरातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याचे समाधान असेल. ‘आयपीएससीडीएल’ने ३१ मेपर्यंत हे काम होणार नाही, हे आधीच जाहीर केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Caculo Mall :

काकुलो मॉलसमोरील काकुलो जंक्शन ते मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि भूमिगत १ मीटर व्यासाच्या सुमारे ८ मीटर खोलीतून जाणाऱ्या मलनिस्सारण वाहिनीचे काम जूनमध्ये पूर्ण होणार असल्याचे ‘आयपीएससीडीएल’ने जाहीर केले आहे.

सध्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे अर्धे काम झालेले आहे. परंतु पुढे सांतिनेज खाडीच्या खालून वाहिनी नेण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पाला नवी वाहिनी जोडण्याचे काम पूर्ण होणार नाही. सध्या ‘आयपीएससीडीएल’चे अधिकारी आणि गोवा नगर विकास प्राधिकरणाचे अधिकारी तसेच कंत्राटदाराचे सर्व कर्मचारी या कामावर लक्ष केंद्रित करून आहेत.

वेलपॉईंट सिस्टीमचा वापर

तीनशे मीटर अंतराच्या या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सांतिनेज परिसरातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याचे समाधान असेल. ‘आयपीएससीडीएल’ने ३१ मेपर्यंत हे काम होणार नाही, हे आधीच जाहीर केले आहे. दरम्यान, ‘आयपीएससीडीएल’ने वेलपॉईंट सिस्टीमचा वापर नव्यानेच सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT