Goa Statehood Day 2024:...अन् गोवा भारताचे 25 वे राज्य झाले, घटकराज्य दिनाचा इतिहास आणि महत्व

Goa Statehood Day 2024 History: गोव्याचे महाराष्ट्र किंवा कर्नाटकात विलीनकरण करण्याबाबत 16 जानेवारी 1967 रोजी देशातील पहिला आणि एकमेव जनमत कौल घेण्यात आला.
Goa Statehood Day 2024:...अन् गोवा भारताचे 25 वे राज्य झाले, घटकराज्य दिनाचा इतिहास आणि महत्व
GoaDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य आहे. गोवा जगभरात एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे, येथील मनमोहक समुद्रकिनारे, निसर्गरम्य परिसर, येथील नाईट लाईफ, इतिहास जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत असतात.

गोव्याला 30 मे 1987 रोजी भारताचे 25 वे राज्य म्हणून दर्जा मिळाला. दरवर्षी हा दिवस गोवा घटकराज्य दिन म्हणून साजरा केला जातो.

Goa Statehood Day 2024:...अन् गोवा भारताचे 25 वे राज्य झाले, घटकराज्य दिनाचा इतिहास आणि महत्व
Goa Fraud Case: बंगल्यासाठी जमीन देण्याचा वादा; मुंबईच्या अ‍ॅड फिल्म डिरेक्टरला गोव्यातील दाम्पत्याचा दीड कोटींचा चुना

इतिहास

गोवा 450 वर्षांहून अधिक काळ पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. 1510 साली गोव्यात पोर्तुगीज दाखल झाले, येथून पुढे त्यांनी गोव्यात त्यांचे प्रस्थ निर्माण केले. अखेर भारतीय सेनेने केलेल्या ऑपरेशन विजयनंतर 19 डिसेंबर 1961 साली गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झाला.

गोव्याचे महाराष्ट्र किंवा कर्नाटकात विलीनकरण करण्याबाबत 16 जानेवारी 1967 रोजी देशातील पहिला आणि एकमेव जनमत कौल घेण्यात आला.

1987 साली राजीव गांधी पंतप्रधान असताना गोव्याला पूर्ण राज्य बनविणारे विधेयक मंजूर करण्यात आले. 30 मे 1987 रोजी गोवा भारताचे 25 वे राज्य झाले.

तसेच, पणजी ही राज्याची राजधानी घोषित करण्यात आली आणि कोकणी ही गोव्याची अधिकृत भाषा म्हणून घोषित करण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी 30 मे रोजी गोवा घटकराज्य दिन म्हणून साजरा केला जातो.

महत्व

गोव्यात दरवर्षी मोठ्या थाटामाटात घटकराज्य दिन साजरा केला जातो. या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

गोव्याला 450 वर्षांच्या जुलमी पोर्तुगीज राजवटीपासून मुक्तीसाठी बलिदान दिलेल्या लोकांचे स्मरण केले जाते व त्यांना आदरांजली दिली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com