Cabinet Expansion of Goa Government Dainik Gomantak
गोवा

सुदिन ढवळीकरांसह फळदेसाई, हळर्णकर यांची गोव्याच्या कॅबिनेटमध्ये वर्णी

मंत्रिमंडळाचा आज राजभवनात होणार विस्तार; उद्या खातेवाटप

दैनिक गोमन्तक

पणजी : प्रमोद सावंत सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार शनिवारी निश्‍चित झाला असून त्यात मगोपच्या सुदिन ढवळीकर यांच्यासह सांगेचे भाजपचे आमदार सुभाष फळदेसाई आणि थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांचे मंत्रिपद निश्‍चित झाले आहे. सुभाष फळदेसाई हे विधानसभेचे उपसभापती आहेत. मात्र, त्यांना मंत्रिपद मिळाल्याने या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेच खातेवाटप करण्याची शक्यता मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे. त्यानुसार उद्या (रविवारी) खातेवाटप होईल. यापूर्वी रोहन खंवटे यांना मंत्रिमंडळात घेतल्याने हळर्णकर हे बार्देशचे दुसरे भाजप नेते आहेत. सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळात घेतल्याने फोंडा तालुक्यात चार मंत्री होणार असले, तरी मगोपच्या प्रस्तावानुसार ढवळीकर यांना मंत्रिपद देण्यात येत आहे. शनिवारी दुपारी १२ वाजता राजभवन परिसरात नव्याने उभारलेल्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई या तीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी सावंत मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. त्यासाठी केरळ दौऱ्यावर असलेले राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई शुक्रवारी गोव्यात परतले.

सूत्रांच्या मते, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना मंत्रिमंडळात घ्यायचे की नाही, यासंदर्भात भाजपमध्ये दुमत आहे. त्यांच्याऐवजी नीळकंठ हळर्णकर आणि गणेश गावकर यांचा समावेश मंत्रिमंडळात करावा, अशी चर्चा सुरू होती. यापूर्वी नावेलीचे माजी आमदार आवेर्तान फुर्तादो आणि फिलीप नेरी रॉड्रिग्स यांचा भाजप मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. परंतु निवडणुकीच्या काळात ते भाजपपासून फारकत घेतात. सासष्टीच्या (Salcete) ख्रिस्ती सदस्यांना मंत्रिमंडळात घेतल्यास त्याचा फायदा भाजपला होत नाही. निवडणुकीच्या ऐन धामधुमीत ते पक्ष सोडून सेक्युलर पक्षाच्या आडोशाला जाण्याचा प्रयत्न करतात.

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांचे नाव सुरवातीपासूनच सर्वाधिक चर्चेत होते. मात्र, स्थानिक आणि केंद्रीय भाजप नेत्यांच्या सूचनेनुसार त्यांना मंत्रिपदाऐवजी महामंडळ देण्याचे ठरल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्याऐवजी सुभाष फळदेसाई यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.

राजभवन परिसरामध्ये राज्य सरकारने 17 कोटी रुपये खर्चून भव्य दरबार हॉलची निर्मिती केली आहे. या हॉलमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, सावंत सरकारचा शपथविधी डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर झाल्याने नव्या दरबार हॉलमध्ये प्रथमच आजचा शपथविधी होत आहे.

सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांना मंत्रिमंडळात घेऊ नये, यासाठी फोंडा तालुक्यातील भाजपच्या गटनेत्यांसह रवी नाईक, गाेविंद गावडे, बाबूश मोन्सेरात, नीलेश काब्राल यांनी विरोध दर्शविला होता. मात्र, राज्यसभा, लोकसभेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून केंद्रीय नेत्यांनी त्यांचे नाव सुचविले आहे. ढवळीकरांना मंत्रिमंडळात घ्यावे, यासाठी विश्‍वजीत राणे हे आग्रही होते.

राज्यात 52 टक्के महिला मतदार असल्याने मंत्रिमंडळात महिलांना स्थान मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, विश्‍वजीत राणे, बाबूश मोन्सेरात यांना यापूर्वीच मंत्रिमंडळात स्थान दिल्याने डॉ. दिव्या राणे आणि जेनिफर मोन्सेरात (Jennifer Monserratte) यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही, हे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रथमच महिला मंत्र्यांशिवाय हे मंत्रिमंडळ असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT