माझा निर्णय कार्यकर्त्यांना माहीत आहे: दिगंबर कामत

'अफवा पसरवत असल्याचा आरोप करत माध्यमांना फटकारले'
Digambar Kamat
Digambar Kamat Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मी कुठे जाणार आणि कुठे नाही हे मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. माझ्या कार्यकर्त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. माझे निर्णय मला प्रसारमाध्यमांना सांगायची गरज वाटत नाही, अशा शब्दात आज मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी प्रसारमाध्यमांना फटकारले.

दिगंबर कामत भाजप पक्षात प्रवेश करण्यासाठी दिल्लीत गेले आहेत अशी बातमी राष्ट्रीय वृत्तवाहिनीसह गोव्यातील माध्यमांनी दिल्यानंतर कामत यांनी आपण भाजप श्रेष्ठींना भेटण्यासाठी नव्हे, तर एका लग्न समारंभाला हजर राहण्यासाठी पत्नीसह दिल्लीला गेलो होतो असा खुलासा त्यांनी केला होता.

Digambar Kamat
'गोवा सरकारने ई-बाईकसाठीच्या अनुदानाचा तपशील द्यावा'

तरीही आज मडगावात रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी ते आले असता प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना पुन्हा विचारले असता, परत परत खुलासे करत बसण्यास मला वेळ नाही. मी माझी भूमिका यापूर्वीच मांडली आहे. आता प्रसारमाध्यमे काय बातम्या देतात त्याच्याशी मला काही देणे घेणे नाही. मी प्रसारमाध्यमांमुळे नव्हे, तर माझ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर जिंकून येतो, असे ते म्हणाले.

आज सांयकाळी आणखी एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने त्यांना हाच प्रश्न विचारल्यावर भडकलेल्या कामत यांनी तुमच्या प्रश्नांना परत परत उत्तरे देत बसण्याएवढा मी कमी दर्जाचा राजकारणी नव्हे, राजकारणात मान मिळविलेला मी राजकारणी आहे हे ध्यानात ठेवा, असे ते म्हणाले.

राष्ट्रीय माध्यमानी हे वृत्त दिले होते याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी नंतर माझी माफीही मागितली असे कामत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

home minister amit shah reviews goa st reservation file
mormugao port goa coal import cargo handling capacity
diksha parwadkar accident
dabolim selected model solar village goa pm surya ghar yojana chicalim panchayat geda grant rajeev samant
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com