फोंडा पालिकेवर भाजपचं वर्चस्व, नगराध्यक्ष कोण होणार?

नगराध्यक्ष गिताली तळावलीकर आणि उपनगराध्यक्ष जया सावंत यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव संमत
No-confidence motion in Ponda Municipality
No-confidence motion in Ponda MunicipalityDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा : फोंडा पालिकेच्या नगराध्यक्ष गिताली तळावलीकर आणि उपनगराध्यक्ष जया सावंत यांच्याविरुद्ध आणलेला अविश्‍वास ठराव आज शुक्रवारी 9 विरुद्ध 0 मतांनी संमत झाला. गेला बराच काळ हुलकावणी देत असलेली फोंडा पालिका आता भाजपच्या ताब्यात आली असून फोंडा पालिकेच्या एकूण पंधरा सदस्यीय मंडळापैकी नऊ नगरसेवक बैठकीला उपस्थित होते तर इतर सहा पंचसदस्यांनी गैरहजर राहणे पसंत केले.

मगो समर्थक नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षाला हटवल्याने आता फोंडा पालिकेवरील मगो पक्षाचे (MGP) वर्चस्व जाऊन भाजपराज निश्‍चित झाले असून नगराध्यक्षपदी रितेश नाईक यांची वर्णी लागणे शक्य आहे.

No-confidence motion in Ponda Municipality
गोव्याचं पाणी आखाती देशात नेणार, आमदार रवी नाईक पुन्हा चर्चेत

फोंडा पालिकेच्या नगराध्यक्ष गिताली तळावलीकर आणि उपनगराध्यक्ष जया सावंत यांच्याविरुद्ध रितेश नाईक, विश्‍वनाथ दळवी, आनंद नाईक, वीरेंद्र ढवळीकर, यतिश सावकार, विलियम आगियार, अर्चना नाईक डांगी आणि चंद्रकला नाईक यांनी गेल्या 1 एप्रिल रोजी अविश्‍वास ठराव आणला होता. या ठरावावर चर्चा करण्यासाठी पालिकेत खास बैठक बोलावण्यात आली. यावेळी अविश्‍वास ठराव आणलेले आठही नगरसेवक तसेच व्यंकटेश ऊर्फ दादा नाईक मिळून एकूण नऊ नगरसेवकांनी बैठकीला उपस्थिती लावली. नियमाप्रमाणे बैठकीचे कामकाज घेऊन ठरावाचा निकाल लावण्यात आला, त्यावेळेला ठरावावर सही न केलेले व्यंकटेश ऊर्फ दादा नाईक यांनी ठरावाच्या बाजूने समर्थन दिले, त्यामुळे अविश्‍वास 9 विरुद्ध 0 मतांनी संमत झाला.

फोंडा (Ponda) पालिकेच्या नगराध्यक्ष गिताली तळावलीकर यांची केवळ तीन महिन्यातच उचलबांगडी करण्यात आली. उपनगराध्यक्ष असलेल्या जया सावंत यांना केवळ पाच महिन्यांचा कार्यकाळ मिळाला. या पालिका मंडळात आतापर्यंत पाच नगराध्यक्ष फोंडा पालिकेने पाहिले असून त्यात प्रदीप नाईक, व्यंकटेश नाईक, विश्‍वनाथ दळवी, शांताराम कोलवेकर आणि गिताली तळावलीकर यांचा समावेश आहे. आता सहाव्या नगराध्यक्षाची निवड होणार आहे.

No-confidence motion in Ponda Municipality
मुरगावमध्ये संकल्प आमोणकरांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

फोंडा पालिकेचे नगरसेवक रितेश रवी नाईक यांना यावेळेला नगराध्यक्षपदासाठी संधी आहे. काँग्रेसमधून (Congress) फुटून भाजपात येताना रितेश नाईक यांना नगराध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली होती, मात्र नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत रितेश नाईक यांना भाजपकडूनच दगाबाजी झाल्याने नगराध्यक्षपद हुकले होते. आता राज्यात भाजपचेच (BJP) सरकार असून फोंड्याचे आमदारही भाजपचे असल्याने रितेश नाईक यांची निवड निश्‍चित झाली असल्याचे समजते.

No-confidence motion in Ponda Municipality
मंत्रिपद कुणाला नको, जीत आरोलकर यांचं सूचक वक्तव्य

फोंडा पालिकेचे माजी नगराध्यक्ष व्यंकटेश ऊर्फ दादा नाईक यांनी अविश्‍वास ठरावाला ऐनवेळी समर्थन दिले. वास्तविक व्यंकटेश नाईक आणि त्यांच्या भावजय असलेल्या चंद्रकला नाईक यांनी भाजपमधून फुटून गोवा फॉरवर्डला (Goa Forward Party) गेल्या विधानसभा निवडणुकीत समर्थन दिले होते. पण निवडणुकीच्या तोंडावर चंद्रकला नाईक यांनी गोवा फॉरवॉर्डचा राजीनामा दिला होता. मात्र व्यंकटेश नाईक गोवा फॉरवर्डमध्येच होते, त्यामुळे नेमकी मते कुणी कुणाला दिले त्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. आताही चंद्रकला नाईक यांनी अविश्‍वास ठरावावर अगोदरच सही केली होती, तर दादाचे समर्थन ऐनवेळी मिळाले.

आतापर्यंत नगराध्यक्ष किंवा उपनगराध्यक्ष निवडीवेळी एका नगरसेवकाची निर्णायक ठरली होती. प्रत्येकवेळी आठ नगरसेवक जमवताना अविश्‍वास आणलेल्यांच्या नाकी नऊ आले होते. प्रत्येक अविश्‍वास ठरावावेळी केवळ एकाच नगरसेवकाने ऐनवेळी घुमजाव केल्याने चित्र बदलले होते. पण आता प्रथमच नऊ नगरसेवक एकत्रित झाल्याने एकाचे भय कमी झाल्याची चर्चा खुद्द नगरेसवकांतच होताना दिसली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com