Goa Churchill Alemao ‘सँड ड्युन्स’ क्षेत्र घोषित केल्यास व्यावसायिक देशोधडीला : चर्चिल Dainik Gomantak
गोवा

‘सँड ड्युन्स’ क्षेत्र घोषित केल्यास व्यावसायिक देशोधडीला : चर्चिल

सध्या गोव्यात खनिज व्यवसाय बंद झाल्याने पर्यटन व्यवसाय हा एकमेव अर्थव्यवस्थेचा स्रोत खुला असल्याचे मत बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी व्यक्त केले

दैनिक गोमन्तक

मडगाव: सध्या गोव्यात (Goa Churchill Alemao) खनिज व्यवसाय बंद झाल्याने पर्यटन व्यवसाय हा एकमेव अर्थव्यवस्थेचा स्रोत खुला असल्याचे मत बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी व्यक्त करून आरोसी ते केळशी हा किनारपट्टीचा भाग ‘सँड ड्युन्स’ म्हणून घोषित केल्यास या भागातील पूर्ण पर्यटन व्यवसाय ठप्प होतील, अशी भीती त्‍यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

गोव्याच्या सीआरझेड आराखड्यात हा पट्टा सँड ड्युन्स विभाग म्हणून दाखविण्यात आलेला आहे. ही नोंदणी चुकीची असून, या भागात ज्या वाळूच्या टेकड्या दाखविल्या गेल्या आहेत त्या मूळ टेकड्या नसून, साळ नदीचे मुख बांधून न काढल्याने जी वाळू वाहून गेली त्यामुळे ही कृत्रिम धड तयार झाली आहे, असा दावा आलेमाव यांनी करून आराखडा समितीच्या या शिफारशी सरकारने स्वीकारू नयेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना त्यांनी तसे पत्र लिहिले आहे.

हा किनारपट्टी भाग रूपेरी वाळूसाठी प्रसिद्ध असून, इतर ठिकाणी अशी वाळू दिसत नसल्याने जगभरातील पर्यटक येथे येत असतात. या भागात अनेक शॅक व्यावसायिक या पर्यटनावर अवलंबून आहेत. जर हा भाग सँड ड्युन्स पट्टा म्हणून दाखविला तर या भागातील पर्यटन व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. सुरावली ते मुंगूल दरम्यानच्‍या पश्चिम बगल रस्त्याचा २.५ किमी भाग कमी खर्चात स्टिल्टवर कसा बांधता येणे शक्य आहे त्याचा एक नवीन प्रस्ताव आपण सरकारला दिल्याचीही माहिती त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Borim Accident: बोरी येथे भीषण अपघात! काँक्रिटवाहू ट्रकची कारला धडक, लहान मुलांसह 6 जण जखमी; तेलंगणातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Asia Cup: फलंदाजी आणि गोलंदाजीत सचिनचा दबदबा! आशिया कपमधील मास्टर ब्लास्टरचा 'तो' ऐतिहासिक रेकॉर्ड आजही अबाधित

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT