...अन्‍यथा नव्‍या मार्केटला विरोधच

वास्‍कोतील मासळी विक्रेत्‍यांचा इशारा : मागण्‍या मान्‍य होईपर्यंत बांधकाम नको
Fish Market In Vasco
Fish Market In VascoDainik Gomantak
Published on
Updated on

दाबोळी : खारीवाडा-वास्को (Vasco) भागातील घाऊक मासळी विक्री करणाऱ्या मच्छीमार व्यावसायिकांना तसेच शहरात मोक्याच्या ठिकाणी बसणाऱ्या परप्रांतीय मासळी विक्रेत्या महिलांवर बंदी आणा. नंतरच नवीन मासळी मार्केट बांधकामास हात घाला; अन्यथा आम्ही हे मासळी मार्केट बांधण्यास विरोध करणार, असा इशारा वास्को मासळी मार्केटमधील विक्रेत्‍या महिलांनी दिला.

Fish Market In Vasco
Goa: राज्यात इंधन दरवाढीचा भडका, सामान्यांच्या खिशाला झळ

मासळी विक्रेत्या महिलांची मागणी जोपर्यंत धसास लागत नाही तोपर्यंत नवीन मासळी मार्केटचा प्रश्न सुटणार नाही, हे आता नक्की झाले आहे. मुरगाव पालिकेतर्फे मासळी मार्केटच्या जागी नवीन सुसज्ज इमारत बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने ‘सुडा’कडे संबंधित रक्कम वर्ग केली आहे. त्यानुसार मासळी मार्केटमधील विक्रेत्यांना देव दामोदर ट्रस्टच्या जागेवर हलवण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी या मासळी विक्रेत्या महिलांनी एकत्रित जमून जोपर्यंत घाऊक मासे विक्रेत्यांना तसेच शहरात इतर ठिकाणी मोक्याच्या ठिकाणी मासे विक्री करणाऱ्यांवर बंदी आणत नाही, तोपर्यंत मासळी मार्केटमधून आम्ही कोणत्याही परिस्थितीत हलणार नाही, असा इशारा दिला.

Fish Market In Vasco
नागाळीत डोंगरकापणीमुळे लोकं भीतीच्या छायेखाली

आश्‍‍वासन पूर्ण केले नाही

मासळी मार्केट संघाच्या अध्यक्षा कारिदाद यांनी सांगितले, की पाच महिन्यांपूर्वी वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा, मुख्याधिकारी, उपजिल्हाधिकारी तसेच वास्को पोलिस निरीक्षक यांची संयुक्त बैठक मासळी विक्रेत्‍या महिलांसोबत झाली होती. घाऊक मासळी विक्रेते संबंधी तसेच मोक्याच्या ठिकाणी बसून मासळी विक्री करणाऱ्यांविरुद्ध आम्‍ही बैठकीत प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हा त्या विक्रेत्यांना तेथून हटविण्यात येणार असल्याचेही आश्वासन आम्हाला संबंधित अधिकाऱ्यांनी व आमदार आल्मेदा यांनी दिले होते. मात्र, आजपर्यंत कारवाई झालेली नाही. आता नवीन मासळी मार्केटचे बांधकाम करण्यासाठी आम्हांला स्थलांतर करण्यास ते कशाच्‍या आधारावर सांगत आहेत. आधी त्या विक्रेत्यांवर बंदी आणा; नंतरच नवीन मासळी मार्केट बांधण्यास पुढाकार घ्यावा. तोपर्यंत आम्ही या जागेवरून हटणार नाही, असा इशारा कारीदाद यांनी दिला.

आमदारांना अपयश

संघटनेचे कायदा सल्लागार फा. मायकल म्‍हणाले, मासळी मार्केटमधील विक्रेत्यांचा प्रश्न सोडविण्यात वास्कोचे आमदार अपयशी ठरले आहेत. जोपर्यंत त्यांचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत नवीन मासळी मार्केटचे बांधकाम हाती घेणे बरोबर नाही. तसेच खारीवाडा येथे एक नगरसेवकच बेकायदेशीररीत्या घाऊक मासळी विक्री करत आहे. त्यामुळे इतर घाऊक विक्रेत्यांना पाठिंबा मिळतो. आमदार आल्मेदा यांनी मासळी मार्केटमधील विक्रेत्यांचा प्रश्न सोडवावा, नंतरच नवीन मार्केट बांधकामास हात घालावा.

Fish Market In Vasco
‘आप’च्या लोकप्रियतेमुळे भाजपचे धाबे दणाणले : म्हांबरे

लोकांना घाऊक मासळी विक्रेत्याकडून कमी दरात वजनावर स्वस्त दरात मासळी मिळते. त्यामुळे लोक त्यांच्याकडे जाणारच. तरी त्यांच्यावर आम्ही कारवाई सुरूच ठेवली आहे. मात्र, त्यांच्यावर २४ तास पाळत कशी ठेवणार? घाऊक मासळी विक्रेत्यांना लवकरच दत्तात्रेय मार्गाच्या बाजूस पालिकेच्या जुन्या मासळी मार्केटमध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे. मासळी मार्केटमधील विक्रेत्यांच्या मागणीनुसार घाऊक मासळी विक्रेत्यांवर कारवाई सुरू आहे. मासळी विक्रेत्या महिला व खारीवाडा येथील घाऊक विक्रेत्यांमध्ये दुजाभाव होऊ नये यासाठी घाऊक विक्रेत्यांना हल्लीच नूतनीकरण करण्यात आलेल्या जुन्या मार्केटमध्ये एकाच ठिकाणी आणणार आहे.

- कार्लुस आल्मेदा, वास्कोचे आमदार

नवीन मासळी मार्केट हे मासळी विक्रेत्यांच्या भल्यासाठीच आहे. त्यांनी यात आडकाठी आणणे बरोबर नाही. ज्यांना मोठे मासे व जास्त प्रमाणात मासळी हवी आहे तो घाऊक दरात मासे घेणारच. तसेच जो माणूस दररोज मासळी मार्केटमध्ये येतो तो मासळी मार्केटमध्ये येणारच, त्यामुळे मासळी विक्रेत्या महिलांनी निराश होऊ नये. येणाऱ्या दीड वर्षाच्या कार्यकाळात नवीन सुसज्ज असे मासळी मार्केट बांधून दिले जाईल.

- दामोदर कासकर, नगराध्यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com