Goa Road Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Road Accident: अपघाताने उद्ध्वस्त केले लग्नाचे स्वप्न; केरये येथे कंटेनरला बुलेटची भीषण धडक, पंढरपूरच्या तरुणाचा जागीच मृत्यू

Keraye Road Accident Goa: दुचाकीवरील दुसरा स्वार अभिषेक भीमराव धावरे (वय २५ वर्षे, मूळ पंढरपूर) जखमी झाला असून त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा: कुर्टी-खांडेपार महामार्गावरील केरये येथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव बुलेटने मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील दुचाकीस्वार उद्धव बाळासाहेब कोळी याचा जागीच मृत्यू झाला. मृत उद्धव याचा विवाह नुकताच जुळला होता. विवाहापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने भोसे (करकंब) परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दुचाकीवरील दुसरा स्वार अभिषेक भीमराव धावरे (वय २५ वर्षे, मूळ पंढरपूर) जखमी झाला असून त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असली, तरी तो बोलत नसल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही. हा अपघात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला.

राजस्थानहून माल घेऊन फोंड्याकडे आलेला आरजे-०६-जीसी-९९८९ क्रमांकाचा कंटेनर केरये येथे अचानक नादुरुस्त झाला. त्यामुळे चालकाने कंटेनर रस्त्यालगत थांबवून दुरुस्तीचे काम सुरू केले. मात्र, महामार्गावर वाहन थांबविताना आवश्यक ती खबरदारी घेतली नसल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले.

दरम्यान, महाराष्ट्रातून फोंड्याच्या दिशेने एमएच-१३-एफबी-५०१९ क्रमांकाची बुलेट भरधाव वेगाने येत होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने किंवा समोर उभे असलेले वाहन वेळीच न दिसल्याने बुलेट कंटेनरच्या मागील भागावर जोरात आदळली. ही धडक इतकी भीषण होती, की दुचाकीस्वार उद्धव याचा जागीच मृत्यू झाला. दुसरा स्वारही जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

मोटारसायकलचा चेंदामेंदा

केरये महामार्गावर नादुरुस्त झालेला कंटेनर रस्त्याच्या कडेला उभा होता. त्याची योग्य सूचना किंवा सुरक्षा व्यवस्था नसताना मागून आलेल्या भरधाव बुलेटची ट्रकला जोरात धडक बसली. या अपघातात मोटारसायकलचा चेंदामेंदा झाला.

उद्धव एकुलता एक मुलगा

भोसे (करकंब, ता. पंढरपूर) येथील उद्धव बाळासाहेब कोळी हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तो गोवा येथील एका वैद्यकीय क्षेत्रातील कंपनीत वर्षभरापासून नोकरीला होता. गावी आलेला उद्धव आणि त्याचा मित्र अभिषेक हे एका दिवसापूर्वीच बुलेटने गोव्यात आले होते. अपघाताची बातमी समजताच उद्धवचे नातेवाईक शुक्रवारी गोव्याकडे रवाना झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs SA: कॅन्सरवर मात करुन 10 वर्षांनंतर संघात परतला, पण 33 चेंडू खेळूनही खातं उघडता आलं नाही; ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या नावावर नकोसा रेकॉर्ड

Jeffrey Archer: संसद ते तुरुंग अन् तिथून 'बेस्टसेलर' लेखकापर्यंत! जेफ्री आर्चर यांचा थक्क करणारा प्रवास

Nobel Peace Prize 2026: भारतीय वंशाच्या ‘नावी’ पिल्लई यांना मानाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर; न्यायासाठीचा संघर्ष ठरला यशस्वी

Arjun Tendulkar Injury: अर्जुन तेंडुलकरला दुखापतीचा फटका; गोव्याच्या रणजी सलामीच्या सामन्याला मुकणार!

Weightlifting Coach Recruitment: वेटलिफ्टिंग प्रशिक्षक निवडीला पुन्हा 'ब्रेक'; सर्वोच्च न्यायालयाकडून प्रकरण फेरसुनावणीसाठी परत

SCROLL FOR NEXT