Goa Crime: म्हापशात पोलिसांची मोठी कारवाई;2 किलो गांजा जप्त, झारखंडच्या 22 वर्षीय युवकाला अटक

Mapusa Ganja Arrest: नशामुक्त भारत अभियानांतर्गत अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात धडक मोहीम राबवत म्हापसा पोलिसांनी एका युवकाला अटक करून त्याच्याकडून सुमारे २ लाख रुपये किमतीचा २ किलो गांजा जप्त केला.
Mapusa Ganja Arrest
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: नशामुक्त भारत अभियानांतर्गत अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात धडक मोहीम राबवत म्हापसा पोलिसांनी एका युवकाला अटक करून त्याच्याकडून सुमारे २ लाख रुपये किमतीचा २ किलो गांजा जप्त केला.

विशाल कुमार मांझी (वय २२ वर्षे, मूळ झारखंड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयितास न्यायालयात हजर केले असता त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Mapusa Ganja Arrest
Goa Politics: 'भाजपचा पराभव करण्यासाठीच गोवा फर्स्ट'; विजय सरदेसाईंचा काँग्रेसलाही टोला, 'आमचे लक्ष्य फातोर्डा नव्हे, गोवा'

१६ सप्टेंबर रोजी रात्री मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे म्हापसा येथील नवीन केटीसी बसस्थानकाच्या पार्किंग परिसरात ८.४५ ते १०.४५ च्या सुमारास हा छापा टाकण्यात आला. पोलिसांनी संशयास्पद हालचालींवरून विशाल कुमार याला ताब्यात घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com