Bulbul Film Festival Dainik Gomantak
गोवा

Bulbul Film Festival: 'बुलबुल' महोत्सवात विद्यार्थ्यांची मांदियाळी! एकाच दिवशी सहा हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती

Bulbul International Children Film Festival: मडगाव येथील रवींद्र भवनात माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे आयोजित चौथ्या बुलबुल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

सासष्टी: मडगाव येथील रवींद्र भवनात माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे आयोजित चौथ्या बुलबुल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. मंगळवारी (ता.१३) सकाळी १७ आणि सायंकाळी १२ शाळांतील मिळून सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांनी महोत्सवाला उपस्थिती लावली.

चित्रपटांसह विविध कार्यशाळा, चर्चासत्रे आणि स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, अशी माहिती महोत्सवाचे संचालक बिपीन खेडेकर आणि सिद्धेश नाईक यांनी दिली. या महोत्सवातून विद्यार्थ्यांमधील कौशल्ये आणि नावीन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन मिळत असून, रोबोट हे विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण ठरत आहेत. दुपारी पाय तियात्रिस्ट सभागृहात प्रदर्शित झालेल्या ब्राझीलच्या ‘द क्राइम जिनिअस’ या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला.

अन्वी गोयल यांच्या ‘डिझाइन अँड कलर युवर ओन मूव्ही सेट’ कार्यशाळेतही विद्यार्थ्यांनी गर्दी केली. चित्रकला स्पर्धेत सुमारे २०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. महिलांसाठी आयोजित सरिता पद्‌मन यांच्या पाककला कार्यशाळेला तसेच पाककला स्पर्धेला प्रतिसाद मिळाला. ‘स्वरसंध्या’ या संगीत कार्यक्रमालाही संगीतप्रेमींची उपस्थिती लाभली.

आजचे आकर्षण

बुधवार, १४ रोजी मेक्सिको, जपान, स्पेन आणि जर्मनीतील बालचित्रपट दाखविण्यात येतील. सकाळी ११.३० वा. चार हजार चित्रपटांसाठी फोली ध्वनी दिलेले करण अर्जुन सिंग यांची कार्यशाळा होईल. दुपारी २.३० वा. सिद्धेश गावणेकर यांची कार्टून व ॲनिमेशन कार्यशाळा आणि त्यानंतर कोकणी चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे. सायं. ४.३० वा. डॉ. विठोबा म्हाळकर यांची पालकत्वावरील कार्यशाळा, तसेच ‘मास्टर व मिस बुलबुल’ स्पर्धा आयोजित केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Alvara Land Goa: घरबांधणीसाठी आल्वारा जमिनी विकू नका! CM सावंतांचा इशारा; वाळपईत आधुनिक कृषी कार्यालयाचे उद्घाटन

Air India Flight Hijack Alert: एअर इंडियाच्या विमानात हायजॅकचा इशारा! 250 प्रवाशांचा जीव टांगणीला; जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग

Birch Nightclub Fire Case: बर्च प्रकरणात भरपाईचा सुवर्णमध्य निघणार? 20 लाखांच्या प्रस्तावावर अद्याप शिक्कामोर्तब नाही

Pakistan Poverty Report: खायला अन्न नाही, राहायला घर नाही! पाकड्यांची पोलखोल करणार UNDP रिपोर्ट; 38 टक्के लोक गरिबीच्या खाईत

Goa Water Crisis: गोव्यात पावसाची विक्रमी तूट, तापमान 37 अंशांपार! आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट?

SCROLL FOR NEXT