Brijbhushan Sharan Singh Gomantak Digital Team
गोवा

Brijbhushan Singh: खासदार ब्रीजभूषण सिंहना अटक करा!

तृणमूल : महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण : क्रीडा मंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध

गोमन्तक डिजिटल टीम

Brijbhushan Singh: महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे आरोप असलेले भाजपचे खासदार तथा कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंग यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी करत तृणमूल काँग्रेसने त्यांच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या कुस्तीपटूंना पाठिंबा जाहीर केला.

यावेळी टीएमसी महिला विभागाच्या समन्वयक अविता बांदोडकर यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी प्रवक्ते जयेश शेटगावकर, अल्पसंख्याक विभागाचे समन्वयक व्हिन्सेंट फर्नांडिस उपस्थित होतेकेंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंच्या या आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्याचाही निषेध केला.

बांदोडकर म्हणाल्या, ''गंभीर आरोप असूनही सिंग यांना भाजप सरकारने अटक केलेली नाही. देशाचा गौरव करणाऱ्या मुलींचा सन्मान आणि प्रतिष्ठा राखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. भाजप सरकार देशाचा अभिमान असलेल्या आमच्या मुलींऐवजी आपल्या पक्षाच्या सदस्यांची बाजू घेत आहे.

आमच्या कुस्तीपटूंनी विरोध करून तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला, तरीही भाजप या मुद्द्यावर गप्प आहे. भाजप सरकारने आरोपांची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु अहवालातील निष्कर्ष अजूनही सार्वजनिक केलेले नाहीत.

कुस्तीपटूंना आंदोलन संपवण्यास सांगणाऱ्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विधानावर जोरदार हल्ला चढवताना बांदोडकर म्हणाल्या, ''कुस्तीपटूंना कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन करणारे क्रीडामंत्री ठाकूर यांचे विधान, या आरोपांची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न आहे. पोलिसांकडून कुस्तीपटूंना मारहाण केली जाते याकडे त्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले ही लाजीरवाणी गोष्ट आहे. या प्रकरणाचा निषेध करण्यात ते अपयशी ठरले आहेत.

‘बेटी बचाओ’ आंदोलन नावालाच!

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या दांभिक विधानांवर टीका करत बांदोडकर म्हणाल्या, ''भाजप सरकारने या धाडसी महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यात आणि चिंता दूर करण्यात असमर्थता दाखवून त्यांचे खरे प्राधान्य उघड झाले आहे.

''पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्या म्हणाल्या, पंतप्रधानांचा ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’वर मनापासून विश्वास आहे की, फक्त जाहिरातबाजी म्हणून पाहिले जाते, हे खेदजनक आहे. भाजप सरकार महिलांच्या हक्कांसाठी लढण्याचा दावा करत असताना, आपल्या देशासाठी असलेला खजिना सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण प्रदान करण्यात अपयशी ठरले आहे. ''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT