Union Minister Nitin Gadkari Death Threat: नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी, दिल्ली पोलिस अलर्ट

Union Minister Nitin Gadkari Death Threat: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची बातमी समोर येत आहेत.
Union Minister Nitin Gadkari
Union Minister Nitin Gadkari Dainik Gomantak

Union Minister Nitin Gadkari Death Threat: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची बातमी समोर येत आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. सूत्रांच्या हवाल्याने, सोमवारी संध्याकाळी नितीन गडकरींना ही धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

ही जीवे मारण्याची धमकी गडकरी यांना दिल्लीतील निवासस्थानी फोनद्वारे देण्यात आली आहे. गडकरींना धमकी मिळाल्यानंतर त्यांच्या कार्यालयाने दिल्ली पोलिसांना याबाबत माहिती दिली. दिल्ली पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांना अशा धमक्या आल्या आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीलाही अशा बातम्या समोर आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याकडे 10 कोटी रुपयांची खंडणीही मागितली होती. त्यावेळी फोन करणाऱ्याने स्वत:ची ओळख जयेश पुजारी उर्फ ​​जयेश कांत अशी सांगितली होती.

नागपुरात असलेल्या गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा फोन करण्यात आला होता. फोन करणार्‍याने 10 कोटी रुपये न दिल्यास गडकरी यांना संपवू अशी धमकी दिली होती.

Union Minister Nitin Gadkari
Online rummy हा जुगार आहे का? हायकोर्टाने निकालात दिले स्पष्ट उत्तर

त्यानंतर, नागपूर (Nagpur) पोलिसांनी जयेशला कर्नाटकातील बेळगावी येथून अटक केली होती. जयेश पुजारी याने गडकरी यांच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलजवळील कार्यालयात तीन वेळा फोन करुन 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती मिळाली.

Union Minister Nitin Gadkari
2024 Loksabha Election: 'जिथे काँग्रेस मजबूत, तिथे पाठिंबा द्यायला तयार...', ममता बॅनर्जींची घोषणा; का बदलला बंगालच्या CM चा मूड?

तसेच, 14 जानेवारी रोजी जयेश पुजारी याने फरार माफिया डॉन दाऊद इब्राहिम कासकरचा खास असल्याचे सांगून गडकरी यांच्या कार्यालयात फोन करुन खंडणी म्हणून 100 कोटी रुपयांची मागणी केली होती. त्याचबरोबर, 21 मार्च रोजी फोन केला असता त्याने 10 कोटी रुपयांची मागणी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com