Vasco Kidnapping Case Dainik Gomantak
गोवा

आईने आत्महत्येचा प्रयत्न केला, वडील नैराश्यात गेले...पण 12 वर्षांनंतरही हरवलेला मुलगा परत येण्याची आशा

आपला मुलगा हरवल्यावर त्या आई-बाबांची अतिशय दयनीय अवस्था झाली. 'तो नक्की परत येईल...', 12 वर्षे झालीत पण अजूनही आई-वडील आस लावून बसलेत

दैनिक गोमन्तक

Vasco Kidnapping Case : गुन्हेगारीच्या अशा अनेक घटना आहेत ज्यामुळे कुटुंबातील सगळ्यांचेच आयुष्य थांबून जाते. यामुळे ते सदस्य कधीच पुन्हा पहिल्यासारखे आयुष्य जगू शकत नाहीत. अशीच एक घटना म्हणजे वास्को पोलिस स्टेशनमधील केस क्रमांक 212. 12 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका मुलाची. आपला मुलगा हरवल्यावर त्या आई-बाबांची अतिशय दयनीय अवस्था झाली.

अशी आहे संपूर्ण घटना

डिसेंबर 2011 मध्ये, मुलगा त्याच्या घराबाहेर एकटाच खेळत होता तेव्हा एका ड्रायव्हरने त्याचे अपहरण केले होते. त्यावेळी मुलाचे वय फक्त 4 वर्षे होते. या घटनेनंतर आई म्हणाली, ‘मला माझे जीवन संपवायचे होते, परंतु लोकांनी मला सांगितले की जर तो परत आला तर तो मला न बघितल्याने अस्वस्थ होईल; तो एक दिवस परत येईल या आशेने मी अजूनही आहे.’

शेजारी राहणाऱ्या आजूबाजूच्या लोकांच्या आश्वासनामुळेच ही आशा टिकून आहे. प्रत्येकजण मला सांगतो की तो जिवंत आहे आणि एक दिवस नक्की परत येईल. तो परत येईपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही, आपल्या मुलाच्या शोधात त्रस्त ती आई म्हणाली.

2011 मध्ये, जेव्हा तिला समजले की आपला मुलगा बेपत्ता आहे, तेव्हा तिने परिसरात त्याचा शोध सुरू केला. त्या दिवशी दुपारी ती आणि तिचे शेजारी वास्को पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी मूल हरवल्याची तोंडी तक्रार केली. त्यावेळी तिला आपल्या मुलाचे अपहरण झाले असावे याची कल्पना नव्हती.

त्या रात्री ती आणि तिचा नवरा पोलिस ठाण्यात पाठपुरावा करण्यासाठी गेले. वास्को पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली, मात्र मुलगा सापडला नाही. त्यानंतर मुलाच्या पालकांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बेपत्ता मुलाची तक्रार नोंदवली. या प्रकरणाचे रूपांतर अखेर अपहरण प्रकरणात झाले.

तेव्हापासून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी कुटुंबीय धडपडत आहेत. अपहरण झालेल्या मुलाच्या आईने सांगितले की शेजारच्या लोकांनी तिला सांगितले की एक ड्रायव्हर तिच्या मुलाकडे आला, त्याला जवळच्या एका बारमध्ये घेऊन गेला आणि त्याला शीतपेय प्यायला दिले. त्यानंतर तो ड्रायव्हर तिच्या मुलासह गायब झाला.

आम्हाला एकच मूल असल्याने माझा नवरा या घटनेनंतर नैराश्यात गेला होता पण मी त्याच्या परत येण्याची वाट बघत खंबीरपणे उभी आहे.

मुलाच्या आईने मुख्य सचिवांना पत्र लिहून पोलिस या प्रकरणाचा तपास योग्य प्रकारे करण्यात अपयशी ठरल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता ही केस सीबीआयने ताब्यात घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT