Sai Baba Temple Dispute Dainik Gomantak
गोवा

Sai Baba Temple Dispute: बोरीतील साईबाबा मंदिराचा ताबा अखेर ट्रस्टकडे! ग्रामस्थांचा विरोध, 21 महिला आंदोलकांवर गुन्हा; पोलिस बंदोबस्तात मंदिर ताब्यात

Borim Sai Baba Temple Dispute: आवेडे-बोरी येथील श्री साईबाबा मंदिराचा ताबा घेण्यासाठी आलेल्या साईबाबा सेवामंडळ ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी अटकाव केल्यानंतर पोलिसांनी २१ महिला आंदोलकांना ताब्यात घेतले.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा: आवेडे-बोरी येथील श्री साईबाबा मंदिराचा ताबा घेण्यासाठी आलेल्या साईबाबा सेवामंडळ ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी अटकाव केल्यानंतर पोलिसांनी २१ महिला आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात मंदिराचा ताबा ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी मामलेदार तसेच इतर सरकारी अधिकारी उपस्थित होते. बोरीतील या साईबाबा मंदिराचा वाद न्यायप्रविष्ट आहे. गेल्या जुलै महिन्यात बोरीतील ग्रामस्थांनी अचानक मंदिराचा ताबा घेतला होता. याविरोधात सेवामंडळ ट्रस्टने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ट्रस्टचे म्हणणे उचलून धरत न्यायालयाने मंदिराचा ताबा सेवामंडळ ट्रस्टला सोपवला आणि पोलिस बंदोबस्तात मंदिराचा ताबा घ्यावा, असे निर्देश दिले.

काय घडले?...

शुक्रवारी ट्रस्टचे अध्यक्ष दिनेश रायकर व इतर पदाधिकारी मंदिरात गेले असता, आधीच ठिय्या मारून बसलेल्या ग्रामस्थांनी त्यांना अटकाव केला. पोलिस उपअधीक्षक शिवराम वायंगणकर तसेच निरीक्षक मोहन गावडे यांनी ग्रामस्थांना सहकार्य करण्याचे आवाहन केले; मात्र त्यांनी नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी मंदिरातील ग्रामस्थांना बाहेर काढले. यानंतर २१ महिला आंदोलकांना पोलिस बंदोबस्तात पोलिस स्थानकात नेण्यात आले.

ग्रामस्थांनी लावलेली कुलपे संबंधित अधिकाऱ्यांच्या साक्षीने तोडण्यात आली असून, सध्या मंदिराचा ताबा सेवामंडळ ट्रस्टकडे आहे. दुसरीकडे, ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम १२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, फोंडा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

यापूर्वी दोघांना केली होती अटक

बोरीतील साईबाबा मंदिराचा वाद न्यायप्रविष्ट असून, सद्यस्थितीत मंदिराचा ताबा सेवामंडळ ट्रस्टकडे देण्यात आला आहे. गेल्या जुलै महिन्यात हा वाद विकोपाला गेल्यानंतर दोघाजणांना अटक आणि ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक केलेल्या दोघांनाही जामिनावर सोडण्यात आले. आता सेवामंडळ ट्रस्टचे पदाधिकारी पोलिस संरक्षणात ताबा घेण्यासाठी आले असता, मंदिरात ठिय्या दिलेल्या ग्रामस्थांनी त्यांना अटकाव केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT