Borim Dainik Gomantak
गोवा

Borim: बोरी येथील साईबाबा मंदिरात लाखो रुपयांचा गैरव्यवहार? अपहाराच्या आरोपानंतर संतप्त ग्रामस्थांनी घेतला मंदिराचा ताबा

Borim Sai Baba Temple: बोरी येथील साईबाबा मंदिराचा ताबा स्वीकारल्यानंतर साईबाबा सेवा मंडळ ट्रस्टच्या नावाखाली मंदिराचा कारभार पाहणाऱ्या समितीने भाविकांची आर्थिक लूट केली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

फोंडा: बोरी येथील साईबाबा मंदिराचा ताबा स्वीकारल्यानंतर साईबाबा सेवा मंडळ ट्रस्टच्या नावाखाली मंदिराचा कारभार पाहणाऱ्या समितीने भाविकांची आर्थिक लूट केली आहे. मंदिराच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप बोरी परिसरातील तिन्ही गावांतील ग्रामस्थांनी केला.

भाविकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्यानेच मंदिराचा ताबा ग्रामस्थांनी घेतला असून मंदिराचे खरे ताबेदार ग्रामस्थच असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी अक्षय नाईक यांनी सांगितले की, मंदिराच्या माध्यमातून सेवा मंडळ ट्रस्टने मोठा आर्थिक अपहार केल्याचा संशय असून या प्रकरणी फोंडा पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

त्यानंतरच ग्रामस्थांनी मंदिराचा ताबा घेतला. सेवा मंडळ ट्रस्टने हे आरोप फेटाळून लावत न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली असली, तरी न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत ग्रामस्थांचाच ताबा ग्राह्य असल्याचा दावा त्यांनी केला. सन २०२३ मध्ये सेवा मंडळ ट्रस्टने मंदिराचा ताबा घेतल्यानंतर मंदिराच्या आर्थिक व्यवहारांबाबत अनेक तक्रारी आल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.

विशेषतः साप्ताहिक गुरुवार उत्सवासाठी येणाऱ्या यजमानांकडून आणि भाविकांकडून अवाजवी शुल्क आकारले जात असल्याचा आरोप करण्यात आला. पूर्वी सुमारे ४० हजार रुपयांत होणारा गुरुवार उत्सवाचा खर्च आता १ लाख रुपयांपर्यंत दाखविला जात असल्याबद्दलही ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला.

ट्रस्टने खर्चाची बिले सादर केली असली, तरी त्यामध्ये आवश्यक तपशील नसल्याचा आरोप नाईक यांनी केला. तसेच मंदिर ज्या जागेवर उभे आहे, ती जागा नेमकी कोणाच्या मालकीची आहे, असा सवाल उपस्थित करत हे मंदिर तिन्ही गावांतील ग्रामस्थांचे असून त्यांचाच त्यावर अधिकार असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.

मंदिराचा ताबा घेताना पदाधिकाऱ्यांनी दिनेश रायकर यांच्या अध्यक्षतेखाली मंदिराची कुलपे तोडली, मात्र मंदिरातील देणगीची रक्कम जाहीर करण्यात आली नाही, असाही आरोप ग्रामस्थांनी केला. ग्रामस्थांना विश्वासात न घेता कारभार चालविण्यात आला असून फोंड्यात स्वतंत्र बँक खाते उघडून त्याद्वारे आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला.

आम्ही साईचरणी सेवा अर्पण केली आहे. आमच्यावर केलेले आरोप पूर्णपणे निराधार आहेत. खरे-खोटे काय ते साईबाबालाच माहीत. न्यायालय या प्रकरणी उचित निर्णय देईल.

- दिनेश रायकर

(अध्यक्ष-साईबाबा सेवा मंडळ ट्रस्ट)

वादामुळे साईभक्तांमध्‍ये संभ्रम

बोरीतील साईबाबा मंदिर हे गोव्यातील प्रसिद्ध श्रद्धास्थान असून दर गुरुवारी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक येथे येतात. मात्र मंदिराच्या ताब्यावरून दोन गटांमध्ये सुरू असलेल्या वादामुळे भाविकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या वादाचा परिणाम मंदिराच्या प्रतिमेवर आणि भाविकांच्या संख्येवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन्ही गटांनी न्यायालयीन वादाऐवजी सामोपचाराने तोडगा काढून मंदिराची प्रतिष्ठा कायम राखावी, अशी मागणी अनेक साईभक्तांनी केली आहे.

ग्रामस्थांचे प्रमुख आरोप काय आहेत?

सेवा मंडळ ट्रस्टकडून आर्थिक गैरव्यवहार व अपहार.

भाविकांकडून आकारले जातेय अवाजवी शुल्क.

साप्‍ताहिक गुरुवार उत्सवाचा खर्च ४० हजारांवरून एक लाख.

खर्चाच्या बिलांमध्‍ये आवश्यक तपशील नाही.

मंदिराचा ताबा घेताना कुलुपे तोडली, पण देणगीची रक्कम जाहीर केली नाही.

स्वतंत्र बँक खात्यामार्फत व्यवहार करण्‍यात आला

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT