Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

DGCA Mandatory Annual Dope Test Indian Pilots: देशातील विमान प्रवाशांच्या सुरक्षेबाबत नागरी विमान वाहतूक मंत्रालय लवकरच एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेऊ शकते.
DGCA Mandatory Annual Dope Test Indian Pilots
Pilots Dope TestDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

DGCA Mandatory Annual Dope Test Indian Pilots: देशातील विमान प्रवाशांच्या सुरक्षेबाबत नागरी विमान वाहतूक मंत्रालय लवकरच एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेऊ शकते. नव्या प्रस्तावित नियमांनुसार, आता देशातील सर्व वैमानिकांची वर्षातून किमान एकदा 'डोप टेस्ट' करणे बंधनकारक केले जाणार आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय या संदर्भात सर्व संबंधित स्टेकहोल्डर्ससोबत सखोल चर्चा करत आहे.

उड्डाणादरम्यान वैमानिकाने कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थाचे सेवन केलेले नसावे आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. सध्याच्या नियमांनुसार दरवर्षी केवळ 10 टक्के वैमानिकांचीच डोप टेस्ट केली जाते.

DGCA Mandatory Annual Dope Test Indian Pilots
India Census 2027: 2027च्या जनगणनेत भिकाऱ्यांची मोजणी होणार नाही! मोदी सरकारचा मोठा निर्णय; नवीन नियमावली जाहीर

या निर्णयामागे अलीकडेच घडलेली एक गंभीर घटना कारणीभूत ठरली. 4 ऑगस्ट रोजी एअर इंडियाच्या फुकेत-दिल्ली उड्डाणादरम्यान विमानात टर्ब्युलन्स निर्माण झाला होता. या घटनेच्या चौकशीदरम्यान विमान उडवणारा मुख्य वैमानिक नशेत असल्याचे समोर आले होते. त्याची दोन वेळा डोप टेस्ट करण्यात आली आणि दोन्ही वेळा त्यामध्ये नशा केल्याचे सिद्ध झाले होते. या घटनेनंतर एअर इंडियाने तात्काळ कठोर पावले उचलत आपल्या सर्व वैमानिकांसाठी वर्षातून एकदा डोप टेस्ट अनिवार्य केली. तसेच, 'फेडरेशन ऑफ इंडियन पायलट' (FIP) या संघटनेनेही DGCA कडे ही चाचणी मर्यादा 10 टक्क्यांवरुन 25 टक्के करण्याची मागणी केली.

DGCA Mandatory Annual Dope Test Indian Pilots
Sugar Import India:10 वर्षांनंतर भारतात पुन्हा साखर आयात! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 31 ऑक्टोबरपर्यंत 10 लाख टन कच्ची साखर आणणार

नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी मंगळवारी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. वैमानिकांच्या ड्रग्ज चाचणीचे नियम अधिक कडक करण्यासाठी DGCA वेगाने काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राममोहन नायडू यांनी सांगितले की, वर्षातून किमान एकदा तरी प्रत्येकाची रँडम चाचणी झाली पाहिजे, असे सरकारचे स्पष्ट मत आहे. मात्र, या निर्णयामुळे उड्डाणांच्या दैनंदिन कामकाजावर (Operational Impact) काय परिणाम होतो आणि सुरक्षेचा दृष्टिकोन कसा सांभाळता येईल, या दोन्ही बाबींमध्ये योग्य समतोल साधला जाईल.

DGCA Mandatory Annual Dope Test Indian Pilots
VIDEO: कुणी केलं कौतुक, तर कुणी मारले टोमणे; टीम इंडियाच्या टी-20 विश्वविजयावर पाकिस्तानच्या खेळाडूंची 'रिअ‍ॅक्शन' व्हायरल!

सध्याचे DGCA चे नियम हे मुख्यत्वे वैमानिक आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स (ATC) यांच्यावर केंद्रित आहेत. याशिवाय विमानाच्या देखभाल दुरुस्तीशी संबंधित अभियंते, प्रमाणपत्र देणारे कर्मचारी, प्रशिक्षणार्थी वैमानिक आणि परीक्षकांवरही हे नियम लागू होतात. लवकरच या नव्या धोरणाची अधिकृत अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Team India players in Ranji Trophy
Kumar Kushagra Century
US Bank Layoffs India 80 Customer Service Employees
India Nuclear Weapons Report 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com