Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Headland Postal Department Property: घरासाठी सदनिका मिळविणे आजच्या काळात जिकिरीचे झाले आहे. त्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात.
Headland Postal Department Property
Headland Postal Department PropertyDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

उदय किनळेकर

दाबोळी: घरासाठी सदनिका मिळविणे आजच्या काळात जिकिरीचे झाले आहे. त्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात. मात्र, हेडलॅण्ड सडा येथे पोस्ट खात्याच्या मालकीच्या दोन सरकारी सदनिका वर्षानुवर्षे बेवारस अवस्थेत पडून असून, त्यापैकी एका सदनिकेत तब्बल चाळीस शेळ्यांचा मुक्काम झाला आहे.

दुसऱ्या बाजूला याच परिसरात भंगार साहित्याचाही साठा होऊ लागल्याने सरकारी मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.हेडलॅण्ड सडा येथील सरकारी शाळेजवळ पोस्ट खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी काही वर्षांपूर्वी दोन इमारती बांधण्यात आल्या होत्या. सुरुवातीला या सदनिकांमध्ये कर्मचारी वास्तव्यास होते. मात्र, कालांतराने कर्मचारी निवृत्त झाले. त्यानंतर सदनिकांकडे दुर्लक्ष झाले आणि त्या हळूहळू वापराविना पडून राहिल्या.

Headland Postal Department Property
Goa Crime: घरात घुसून आई-मुलाला मारहाण! मालमत्तेच्या वादातून जमाव जमवून हल्ला, पोलिसात गुन्हा दाखल

देखभालीअभावी या इमारतींची अवस्था आता अत्यंत दयनीय झाली आहे. ऊन-पावसाचा सतत मारा झाल्याने इमारती जीर्ण झाल्या असून, दारे-खिडक्या मोडून पडल्या आहेत. सदनिकांचे दरवाजे उघडे असल्याने कोणालाही आत प्रवेश करणे सहज शक्य झाले आहे. इमारतींच्या समोर मोठी मोकळी जागा आहे. सध्या या जागेवर अतिक्रमण झालेले नसले तरी सरकारी मालमत्तेचे असेच दुर्लक्ष सुरू राहिल्यास भविष्यात या जागेवरही कब्जा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पोस्ट खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या इमारतींची तातडीने पाहणी करून अनधिकृत वापर थांबवावा आणि सरकारी मालमत्तेचे संरक्षण करावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. या सरकारी जागेवर भंगार साहित्यानेही प्रवेश केला आहे. एका भंगार व्यावसायिकाने टाकाऊ साहित्य येथे आणून साठवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असून, संबंधित यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

Headland Postal Department Property
Goa Illegal Road: मुरडा-सांताक्रुझमधील जलस्रोत पूर्ववत करा; न्‍यायालयाचे निर्देश, बेकायदा रस्ता हटविण्‍याचाही आदेश

चाळीस शेळ्यांचा ‘मुक्काम’

याच संधीचा फायदा घेत एका शेळीपालकाने तळमजल्यावरील खुल्या सदनिकेचा चक्क शेळ्यांसाठी निवारा म्हणून वापर सुरू केला आहे. सुमारे चाळीस शेळ्या या सदनिकेत ठेवण्यात येत असून, व्हरांड्यात शेणखतासाठी लेंड्यांचा साठाही केला जात आहे. सरकारी जागा विनामूल्य मिळाल्याने शेळीपालनाचा व्यवसायही बिनधास्त सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Murgaon Raja Shed Demolition
Bangkok floods 7 lakh people affected
Anjali Nimbalkar Vijay Sardesai Post
Girish Chodankar X post
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com