Arambol: '..गावकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही'! आरोलकरांचे प्रतिपादन; हरमलच्या जमीन रूपांतरणास कडाडून विरोध

Arambol Bhatwadi land conversion: ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव मंजूर करून संबंधित खात्याकडे पाठवला आहे. तरीही डोंगर, जमीन रूपांतरण करून जनतेच्या भावना पायदळी तुडवल्याबद्दल आमदार जीत आरोलकर यांनी नाराजी व्यक्त केली.
Arambol Bhatwadi land conversion
Arambol Bhatwadi land conversionDainik Gomantak
Published on
Updated on

हरमल: हरमल पंचायत क्षेत्रातील भटवाडी येथील सर्व्हे नंबर २४२/०, २७५/० व २४२/१ मधील अंदाजे तीन लाख वीस हजार चौरस मीटर जमीन रूपांतरणास प्रखर विरोध असल्याची प्रतिक्रिया मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत बैठक घेऊन पुन्हा सविस्तर चर्चा करण्यात येईल. मात्र, कुठल्याही परिस्थितीत आपण गावकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नसल्याचे आमदार जीत आरोलकर यांनी स्पष्ट केले. वर्तमानपत्रांमध्ये हरमलमधील जमीन रूपांतर झाल्याचे अधोरेखित केले आहे.

या जमीन रूपांतर प्रकरणात भटवाडी भागातील ग्रामस्थांना सर्व शक्तिनिशी पाठिंबा दिला तसेच विधानसभेत प्रखर विरोध केला आहे. ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव मंजूर करून संबंधित खात्याकडे पाठवला आहे. तरीही डोंगर, जमीन रूपांतरण करून जनतेच्या भावना पायदळी तुडवल्याबद्दल आमदार जीत आरोलकर यांनी नाराजी व्यक्त केली.

ग्रामस्थांनी बैठक घेऊन आपणास निमंत्रित केले होते व त्या बैठकीत ग्रामस्थांच्या विनंतीचा मान ठेवून आपण विरोध असल्याचे पत्र लिहिले होते, असे आमदार आरोलकर यांनी स्पष्ट केले. साधारण दोन महिन्यांपूर्वी त्या जमिनीतील मोठी झाडे कापल्याने तणाव निर्माण झाला होता. वन अधिकारी घटनास्थळी आले असता, त्यांनी नकारात्मक अहवाल दिला.

Arambol Bhatwadi land conversion
Goa Land Conversion: जमीन रूपांतरणाचे तपशील ऑनलाईन जाहीर करा! गोवा माहिती आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

५० सेंटीमीटरपेक्षा उंच बुंध्याच्या झाडांची कत्तल विनापरवानगी केली होती. मात्र, खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच झाडांची मोजमाप करून ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला होता. त्या घटनेचा ग्रामस्थांनी निषेध केला होता, असे ग्रामस्थ दीपंकर नाईक यांनी सांगितले. दरम्यान, ग्रामस्थांच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही ग्रामस्थांसोबत राहणार असल्याचे नमूद केले होते.

Arambol Bhatwadi land conversion
SIT Land Grab Case: तुरुंगात असणारा सुहेल 'मास्टरमाईंड'! जमीन हडप प्रकरण; एकूण 83 संशयितांना अटक, आरोपपत्र दाखल

जातीनिशी लक्ष द्या!

सरकारने या प्रकरणात जातीनिशी लक्ष घालून जनतेला न्याय व दिलासा द्यावा. सरकारने या श्री राष्ट्रोळी डोंगरावरील जमिनी परप्रांतीय लोकांना विकू नयेत. या जमिनी म्हणजे स्थानिकांसाठी वरदान आहेत. तसेच झोन बदल करू नये, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांतून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com