Pair of tigers  Dainik Gomantak
गोवा

बोंडला प्राणीसंग्रहालयालात नवीन वाघाची जोडी येणार?

सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्लूडी) वाघाच्या जोडीसाठी बंदिस्त जागेची व्यवस्था केली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील एकमेव बोंडला प्राणीसंग्रहालयात यंदा वाघाच्या नव्या जोडीचे स्वागत होण्याची शक्यता आहे. नागपूर-महाराष्ट्रातील रेस्क्यू सेंटरमधून प्राण्यांची नवीन जोडी येथे आणण्यासाठी वन विभागाने सरकारकडे मंजुरी मागितली आहे. (Bondla zoo to get new pair of tigers in goa)

सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्लूडी) वाघाच्या जोडीसाठी बंदिस्त जागेची व्यवस्था केली आहे. याबबात बोलताना मुख्य वन्यजीव वॉर्डन संतोष कुमार म्हणाले की, "हा प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे पाठवण्यात आला आहे. पुढे केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची (सीझेडए) परवानगी घेतली जाईल."

“नागपुरातील एका प्राणिसंग्रहालयाने बायसनच्या जोडीच्या बदल्यात वाघाची जोडी देण्याचे मान्य केले आहे. आम्ही आता सरकारी संमती आणि नंतर CZA च्या होकाराची वाट पाहत आहोत. बहुधा, आम्हाला यावर्षी आमच्या प्राणीसंग्रहालयात वाघाची जोडी येईल,” कुमार म्हणाले.

बोंडला प्राणिसंग्रहालयाने अनुक्रमे डिसेंबर 2016 आणि जुलै 2017 मध्ये प्राणिसंग्रहालयाचे प्रमुख आकर्षण असलेल्या राणा आणि संध्या या वाघांच्या पूर्वीच्या जोडीला गमावले. दोन्ही प्राण्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणास्तव झाला होता. 2009 मध्ये विशाखापट्टणमच्या इंदिरा गांधी प्राणीशास्त्र उद्यानातून ही जोडी आणण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Agniveer Recruitment Data Leak: मोठी खळबळ! अग्निवीरांचा डेटा डार्क वेबवर विकायचा डाव? 14 वर्षांच्या मुलाला दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात

Railways New Rules: प्रवाशांनो सावधान! ट्रेनमध्ये मोठ्या आवाजात बोलणे पडू शकते महागात; न ऐकल्यास भोगावा लागू शकतो तुरुंगवास अन् दंड

Check Dam Construction: 3 तालुक्यांत 116 बंधाऱ्यांत पाणी अडवले; परिसरातील भूजल पातळीत वाढ झाल्याचा दावा

Gurpatwant Singh Pannun Murder Plot: खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट, अमेरिकन कोर्टाचा निखिल गुप्ताला झटका; सुनावली 20 वर्षांची शिक्षा

Marigold Farming: काणकोणात झेंडूचा बहर; 1,060 क्विंटल उत्पादन, स्थानिक फुलांना ग्राहकांची पसंती

SCROLL FOR NEXT