दिव्यांगांना सरकारी नोकऱ्यांत आरक्षण देणार: सुभाष फळदेसाई

सुभाष फळदेसाई म्हणाले, ‘‘राज्यातील दिव्यांगजनांच्या अनेक समस्या आहेत, ज्याची दखल घेणे गरजेचे आहे.
Jobs
JobsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दिव्यांगांना सरकारी नोकऱ्यांमध्ये चार टक्के आरक्षणाचे धोरण राज्यात लागू करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी बुधवारी दिले. ते राज्यातील पॅरा क्रीडापटूंच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते. (reservation will be given to handicapped people in goa says Subhash Faldesai)

Jobs
गोव्यात विज्ञान आणि रोबोट्स विषयांच्या अनोख्या कार्यशाळा

सुभाष फळदेसाई म्हणाले, की ‘‘राज्यातील दिव्यांगजनांच्या अनेक समस्या आहेत, ज्याची दखल घेणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील दिव्यांगांची अजून नावनोंदणी झालेली नाही, त्यांचा शोध घेण्यासाठी राज्याच्या समाज कल्याण विभागाने पुढाकार घेतला आहे. 2016च्या दिव्यांग हक्क कायद्यानुसार, दिव्यांगांसाठी नोकऱ्यांत चार टक्के आरक्षण आहे, हे धोरण राज्यात लागू करण्यासाठी प्रयत्न केले जातील.’’ फळदेसाई यांच्या हस्ते राज्य दिव्यांगजन आयोग कार्यालयाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले.

राज्य दिव्यांगजन आयुक्तालयातर्फे पॅरा क्रीडापटूंचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय पॅरा टेबल टेनिस स्पर्धेतील रौप्यपदक विजेता लॉईड फर्नांडिस, इतर सहभागी खेळाडू चेतन साळगावकर, गोपाळ नाईक, लिंडन कार्दोझ, अनुपा पिळगावकर, रुकी राजासाब, मोझेस रॉड्रिग्ज, पॅट्रिक डिसोझा, तसेच पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेतील राष्ट्रीय पदकविजेती साक्षी काळे, पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत सहभागी झालेला गोपाळ कुंकळ्ळकर या खेळाडूंना गौरविण्यात आले.

Jobs
शिरगावात लईराईच्या जत्रेला उत्साहात प्रारंभ

मंत्री सुभाष फळदेसाई यांनी राष्‍ट्रीय पातळीवर गोव्याचा गौरव वाढविणाऱ्या पॅरा खेळाडूंचे अभिनंदन केले. ते म्हणाले, ‘‘अनेक अडथळ्यांचा सामना करूनही या खेळाडूंनी अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे, जी इतरांसाठी प्रेरणादायी आहे.’’

सत्कार सोहळ्यास कदंब वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष आमदार उल्हास तुयेकर, राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, समाज कल्याण सचिव अरुण मिश्रा, दिव्यांगजन सक्षमीकरण विशेष विभागाचे उपसंचालक ताहा हझिक, कदंब वाहतूक महामंडळाचे संचालक संजय घाटे, ‘ड्रॅग’चे अध्यक्ष आवेलिनो डिसा, गोवा पॅरालिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष सुदेश ठाकूर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com