Dharashiv Child Welfare Committee Dainik Gomantak
गोवा

Dharashiv Child Welfare Committee: बालकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांचे प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे धाराशिव समितीला निर्देश

Child Protection India: दक्षिण गोवा बाल कल्याण सामितीकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे, तर धाराशिव बाल कल्याण समितीकडून सर्व बालकांच्या तपशिलांसह दाखल केलेले प्रतिज्ञापत्र न्यायालयाने रेकॉर्डवर घेतले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा बाल कल्याण समितीला बालकांच्या कल्याणासाठी घेतलेल्या व सुचवलेल्या पावलांची माहिती देणारे अतिरिक्त प्रतिज्ञापत्र ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले आहे. ॲड. मोझेस पिंटो यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेझिस आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांनी निर्देश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी व निर्देश १ डिसेंबर २०२६ रोजी देण्यात येईल.

दक्षिण गोवा बाल कल्याण सामितीकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे, तर धाराशिव बाल कल्याण समितीकडून सर्व बालकांच्या तपशिलांसह दाखल केलेले प्रतिज्ञापत्र न्यायालयाने रेकॉर्डवर घेतले आहे. धाराशिव समितीने २३ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशातील विशिष्ट निर्देशांच्या पूर्ततेबाबत योग्य ती पावले उचलण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितला होता, ज्यानुसार न्यायालयाने त्यांना २ आठवड्यांची मुदत दिली. हे अतिरिक्त प्रतिज्ञापत्र ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दाखल करणे बंधनकारक आहे.

न्यायालयाने न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्त केलेल्या ॲड. श्वेता परुळेकर यांना उत्तर गोवा बाल कल्याण समितीद्वारे ओळखलेली ९ बालके आणि दक्षिण गोवा समितीद्वारे ओळखलेली अतिरिक्त ५ बालके, अशा एकूण १४ बालकांच्या फाईल्स तपासणीसाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश धाराशिव समितीला देण्यात आले आहेत. तसेच संबंधित बालकांच्या वैयक्तिक फाईल्सची पाहणी करताना त्या बालकांची ओळख पूर्णपणे गोपनीय राहील याची विशेष काळजी घ्यावी, असे देखील न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mayem Mangrove Destruction: मयडेतील खारफुटींची कत्तल केल्याचा आरोप; 'ग्रीन ब्रिगेड'चा न्यायालयात जाण्याचा इशारा

Caller Name Display Rule: अनोळखी नंबरवरून फोन आल्यावर नावही दिसणार! स्पॅम कॉल, सायबर फसवणूक रोखण्यासाठी दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय

Cooking Oil Recycling: हॉटेल्स, रेस्टॉरंट्सच्या वापरलेल्या तेलाची डिजिटल नोंद होणार? गोवा सरकारला 18 महिन्यांचा आराखडा; प्रस्तावित नियम काय?

Supreme Court: 'धर्मांतरानंतर आरक्षणाचा लाभ मिळणार नाही'! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; नेमंक प्रकरण काय?

Imran Khan: 28 ऑक्टोबरपर्यंत देश सोड! इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस, सीजेपी आंदोलनात सहभागी होणं पडलं महागात

SCROLL FOR NEXT