Goa Politics| Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: सरदेसाईंचे समर्थन सावियो रॉड्रिग्सना भोवले; भाजपच्या नव्या प्रवक्त्यांची घोषणा लवकरच होणार

येत्या दोन दिवसात नव्या नियुक्त्या केल्या जाहीर केल्या जातील अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Politics: सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता असूनही सरकारमधील मंत्र्यांविरोधात बोलणे, पक्षाच्या ध्येय-धोरणांशी विसंगत भूमिका घेणे अशा प्रकारांमुळे चर्चेत असलेले गोवा प्रदेश भाजपचे प्रवक्ते सावियो रॉड्रिग्स यांना प्रवक्तेपदावरून हटविण्यात आले आहे, त्यांच्यासह इतर सहा प्रवक्त्यांच्या नियुक्त्या माघारी घेतल्या.

असून येत्या दोन दिवसात नव्या नियुक्त्या केल्या जाहीर केल्या जातील अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी फातोर्डा कार्निव्हलच्या प्रश्नावर त्यांनी गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती. यापूर्वी कला अकादमी संकुलाच्या नूतनीकरणाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केल्यावर त्यांनी कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांच्यावर टीका करत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती.

हे प्रकरण पक्षाच्या राष्ट्रीय कार्यालयापर्यंत गेले होते. त्यानंतर त्यांना सज्जड तंबी देण्यात आली होती. तरीही ते पक्षविरोधी कारवाया करत राहिले. त्यासाठीच त्यांनी राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे पक्षात त्यांच्याविरोधात प्रचंड नाराजी होती. ही प्रकरणे सावियो यांना भोवल्याचे बोलले जाते.

पक्षात पुनर्रचना सुरू!

तानावडे म्हणाले, पक्षात अनेक बाबतीत पुनर्रचना सुरू आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही मतदारसंघ ते भूतस्तरापर्यंत कार्यकर्त्यांना सक्रिय करत आहोत.

त्याचाच भाग म्हणून सावियो रॉड्रिग्स यांच्यासह गिरीराज पै वेर्णेकर, ॲड. यतीश नायक, प्रेमानंद म्हांबरे, ऊर्फान मुल्ला, सिद्धार्थ कुंकळ्येंकर अशा सर्व प्रवक्त्यांची नियुक्ती मागे घेतली असून येत्या दोन दिवसांत नवे प्रवक्ते जाहीर केल्या जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: नावेलीत दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण

मडगावात दाखल होणार 'राम दिग्विजय रथयात्रा'! पर्तगाळ मठाच्या वर्धापन वर्षानिमित्त होणार आगमन; कुठे घ्याल दर्शन? वाचा माहिती

Panaji Politics: 'पणजीवासीय साथ देतील याची खात्री'! पर्रीकर यांचे ‘मनपा’साठी ‘एकला चलो रे’; भाजपचा अपेक्षित प्रतिसाद नसल्याने पवित्रा

Konkan Railway: कोकण रेल्वे गाड्यांना रोज होतोय उशीर, 1 ते 3 तास होतोय विलंब; संतप्त प्रवाशांनी लिहिले महामंडळाला पत्र

Goa Politics: खरी कुजबुज; महेश मांजरेकरांचा गोवा

SCROLL FOR NEXT