Goa News: ...यामुळे बर्जर-बेकर कंपनीला काम सुरू न करण्याचे प्रदूषण मंडळाकडून निर्देश

सध्या घटनास्थळावरुन धोकादायक कचरा साफ करणे बाकी आहे. घातक साहित्यांची विल्हेवाट लावण्यापूर्वी सदर कंपनीला महामंडळाची परवानगी घ्यावी लागेल.
Goa News
Goa NewsDainik Gomantak

Goa News: गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने पिळर्ण औद्योगिक वसाहतमधील ‘बर्जर-बेकर कोटींग प्रा.लि.’कंपनीचे म्हणणे ऐकत संबंधितांना सध्या कंपनीत कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन (काम) सुरु न करण्यास सांगितले आहे. सध्या महामंडळाने या कंपनीची काम करण्याची परवानगी निलंबित केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने बर्जर-बेकर कंपनीच्या प्रतिनिधींकडून त्यांची बाजू ऐकून घेतली. या बर्जर-बेकर पेंट कंपनीला दि. 10 जानेवारी 2023 रोजी, भीषण आग लागली होती.

ज्यात कंपनीचा अर्धा प्रकल्प जळाला होता. सध्या घटनास्थळावरुन धोकादायक कचरा साफ करणे बाकी आहे. घातक साहित्यांची विल्हेवाट लावण्यापूर्वी सदर कंपनीला महामंडळाची परवानगी घ्यावी लागेल.

महामंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कालच्या सुनावणीदरम्यान कंपनीने महामंडळासमोर पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या उपाययोजना स्पष्ट केल्या. आता प्रदूषण नियंत्रण महामंडळ या कंपनीची पाहणी करणार आहे. त्याचप्रमाणे महामंडळाने सदर कंपनीला कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन सुरु न करण्यास सांगितले आहे.

Goa News
Adani Group: पंतप्रधान नरेंद्र मोदींशी मैत्री करून अदानींनी गोव्यासह देशभरातील लुटल्या बँका

दरम्यान, पिळर्ण औद्योगिक वसाहतीच्या पायथ्याशी असलेल्या साळपे-कांदोळी या गावातील लोकांनी सदर कंपनी ही लोकवस्तीमधून अन्यत्र स्थलांतरीत करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांसह इतर संबंधित प्रशासकीय विभागांकडे केली आहे. त्याचप्रमाणे गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला देखील याप्रश्नी निवेदन देत आपले म्हणणे मांडले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com