Goa Assembly Election 2022 Dainik Gomantak
गोवा

Goa Elections: साळगावकरांसमोर भाजपनिष्ठांचे आव्हान!

दैनिक गोमन्तक

Goa Elections: साळगाव मतदारसंघात यंदाची निवडणूक लक्षवेधी तितकीच चुरशीची होणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे. भाजप, कॉंग्रेस,आप, तृणमूल कॉंग्रेससह अपक्ष उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. या मतदारसंघात कॉंग्रेस आणि भाजप अशी दुहेरी लढत होणार असून भाजप संघटनेत उभी फूट पडलेली आहे. त्यामुळे साळगावकरांसमोर भाजपनिष्ठांचेच आव्हान आहे.

2017 साली भाजपचे दिलीप परुळेकर हे पराभूत झाले होते. गोवा फॉरवर्ड चे जयेश साळगावकर हे जवळजवळ दोन हजार मतांनी निवडून आले होते. सध्या ते भाजपवाशी झाले आहेत.या बदलत्या राजकीय समीकरणांचा प्रभाव यावेळी मतदानावर निश्चित होणार आहे.आप (AAP) ,तृणमूल कॉंग्रेस (TMC) हे नवे पक्ष असले तरी कॉंग्रेसचे केदार नाईक आणि भाजपचे जयेश साळगावकर (Jayesh Salgaonkar) यांच्यात थेट लढतीची अपेक्षा आहे. केदार नाईक या नवख्या कॉंग्रेस उमेदवारने साळगावकर यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केल्याचे चित्र दिसत आहे.

बार्देश तालुक्यातील साळगाव मतदारसंघात भंडारी समाजाचे वर्चस्व आहे. मागील तीन निवडणुकीत या मतदारसंघाचे नेतृत्व याच समाजाने केले आहे.दोन वेळा भाजपचे माजी मंत्री दिलीप परुळेकर यांना संधी दिली तर त्यानंतर 2017 च्या निवडणुकीत लोकांनी गोवा फोरवर्डचे जयेश साळगावकर यांना संधी दिली. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत (Goa Elections 2022) ख्रिश्चन,मुस्लीम आणि भंडारी समाजाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे.

हा मतदारसंघ 1989 ते 2002 पर्यंत कॉंग्रेसच्या हाती होता.त्यावेळी सतत चार वेळा डॉ.विल्फ्रेड डिसोझा निवडून आले होते.पण 2007 च्या निवडणुकीत भाजपचे दिलीप परुळेकर यांनी त्यांना पराभूत करून ‘जाएंट किलर’ ठरले होते.त्यानंतर 2012 साली कळंगुट आणि साळगाव मतदारसंघाची पुनर्रचना झाली.नव्या रचनेनुसार कळंगुट मतदारसंघातील नेरुल,रेईश मागुस, पिळर्ण या पंचायती वगळून गिरी पंचायतीसह साळगाव मतदारसंघात समाविष्ट करण्यात आल्या.त्यामुळे आज या मतदारसंघात नेरुल, पिळर्ण ,रेईश मागुस, साळगाव, सांगोल्डा व गिरी या सहा पंचायती आहेत. या मतदार संघात एकूण 27,313 मतदार असून त्यात 13,371पुरुष तर 13,942 महिला यांचा समावेश आहे. सुमारे तेरा हजार भंडारी समाज,साडेपाच हजार ख्रिश्चन आणि बाकीचे मुस्लिम व अन्य मतदार असून ही मते निर्णायक ठरतात.

भाजपमध्ये जावे लागले तर ‘मी सर्वात प्रथम आमदारकीचा राजीनामा देईन, अशी प्रतिज्ञा करणारे साळगावकर भाजपमध्ये गेले अन् नदी परिवहन मंत्रीही झाले. त्यामुळे ख्रिस्ती समाज प्रचंड नाराज आहे.सध्या त्यांनी गोवा फॉरवर्डला राम राम करून भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांनी उमेदवारीही मिळवली आहे. त्यामुळे साळगावात राजकीय समीकरणे पुन्हा बदलली. निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी साळगावकरांच्या पक्ष प्रवेशाला तीव्र विरोध दर्शवून थेट बंड पुकारले.पण हा विरोध डावलून प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी साळगावची कार्यकारिणीच बरखास्त केली.त्यामुळे वाद आणखी चिघळला. साहजिकच संतप्त भाजप कार्यकर्ते ‘टूगेदर फॉर साळगाव’ या बॅनरखाली एकत्र येऊन त्यांनी साळगावकर यांच्यापुढे जबरदस्त आव्हान उभे केले आहे.

‘अपक्ष’ रुपेश नाईक पूर्वीचे भाजपचे कट्टर कार्यकर्ते असल्याने भाजपच्याच मतांत विभागणीची चिन्हे आहेत. तृणमूलतर्फे भोलानाथ घाडी साखळकर,आपतर्फे मरिओ कार्देरो तर आरजीतर्फे रोहन कळंगुटकर हेही प्रचार करीत आहेत.त्यामुळे कॉंग्रेसचे केदार नाईक व भाजपचे साळगावकर अशीच ही लढत असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT