Damu Naik slams Mauvin Godinho Dainik Gomantak
गोवा

"भाजपची भूमिका, शिस्‍त शिकून घ्‍या", मंत्री माविन गुदिन्‍हो यांना प्रदेशाध्यक्षांकडून कानपिचक्‍या

Goa BJP: धारगळमधील कार्यक्रमात मंत्री माविन गुदिन्‍हो यांनी मगोचे आमदार जीत आरोलकर यांच्‍याबाबत केलेले वक्तव्‍य बेजबाबदार आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: धारगळमधील कार्यक्रमात मंत्री माविन गुदिन्‍हो यांनी मगोचे आमदार जीत आरोलकर यांच्‍याबाबत केलेले वक्तव्‍य बेजबाबदार आहे. मंत्री, आमदारांनी पक्षाच्‍या रिती आणि नितीनुसार मार्गक्रमण करावे. पक्षाची भूमिका आणि शिस्‍त शिकून घ्‍यावी, अशा कानपिचक्‍या भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी मंत्री गुदिन्‍होंना दिल्‍या.

काही दिवसांपूर्वी धारगळमध्‍ये झालेल्‍या एका कार्यक्रमात बोलताना मंत्री गुदिन्‍हो यांनी आमदार जीत आरोलकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपमध्‍ये प्रवेश करून भाजपच्‍या उमेदवारीवर मांद्रेतून निवडणूक लढवावी, असे आवाहन केले होते.

शिवाय आरोलकर यांना मगो पक्षात त्रास होत असल्‍याचा दावाही त्‍यांनी केला होता. यावरून मगोचे अध्‍यक्ष दीपक ढवळीकर यांच्‍यासह केंद्रीय समितीच्‍या पदाधिकाऱ्यांनीही गुदिन्‍हो यांच्‍यावर तोफ डागली होती. मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि दामू नाईक यांनी याबाबत मंत्री गुदिन्‍होंना समज द्यावी, अशी मागणीही त्‍यांनी केली होती.

योग्‍यवेळी योग्‍य कारवाई करू!

आमदार जीत आरोलकर यांच्‍याबाबत मंत्री गुदिन्‍होंनी केलेल्‍या वक्तव्‍यांप्रकरणी त्‍यांच्‍यावर पक्षाकडून कारवाई होणार का? असा प्रश्‍‍न पत्रकारांनी केला असता, मंत्री गुदिन्‍हो यांच्‍यावर योग्‍यवेळी योग्‍य ती कारवाई करण्‍यात येईल, असेही दामू नाईक यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Professional League 2026: स्पोर्टिंग क्लब द गोवाचा 'विराट' विजय! डॉयल अल्विसची शानदार हॅटट्रिक अन् प्रोफेशनल लीगच्या जेतेपदावर तिसऱ्यांदा कोरलं नाव

Goa River Drowning Cases: गोव्यात बेफिकिरीमुळेच बुडण्याच्या घटनांमध्‍ये होतेय वाढ! सत्तरी तालुक्‍यातही चिंता; मद्यसेवन, सुरक्षेअभावी नद्या बनल्‍या धोकादायक

Harmal Wedding Theft : वीज पुरवठा थांबवून मारला डल्ला, लग्नसोहळ्यातील लुटीचा पडद्याआडून खेळ तपासाचे आव्हान

Bicholim Class 11 Admissions : अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ, विज्ञान शाखेसाठी चुरस; ‘ऑनलाईन’ प्रवेश प्रक्रिया सुरू

Goa Kala Academy : कला अकादमीला आता तरी जाग येणार का?

SCROLL FOR NEXT