Ravi Naik, Damu Naik, CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Ponda: 'भाजपचे राजकारण देशाच्या हितासाठी, रक्षणासाठी'! फोंड्यातील भाजप मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

Goa BJP: प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले, की गोव्यात अंत्योदय तत्त्वावर काम केले जात असून गरीब घटकांपर्यंत सुविधा पोचवल्या जात आहेत.

Sameer Panditrao

फोंडा: भारतीय जनता पक्षाचे राजकारण हे स्वतःच्या फायद्यासाठी नव्हे, तर देशाच्या हितासाठी, देशाच्या रक्षणासाठी असून कार्यकर्त्यांनी समर्पित भावनेने कार्य करून भाजपला पुढील निवडणुकीत विजयी करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फोंड्यातील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात केले.

फोंड्यातील यशवंत सभागृहात आज हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, फोंड्याचे आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक, फोंडा नगराध्यक्ष आनंद नाईक, ओबीसी आयोगाचे अध्यक्ष ॲड. मनोहर आडपईकर तसेच फोंडा मंडळ अध्यक्ष हरेश नाईक, भाजपाचे पदाधिकारी संजीव देसाई, प्रभाकर गावकर, विश्वनाथ दळवी, रूपक देसाई, शौनक बोरकर, दीपा कोलवेकर, सर्वानंद भगत व इतर मान्यवर उपस्थित होते.

Goa BJP

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले, की गोव्यात अंत्योदय तत्त्वावर काम केले जात असून गरीब घटकांपर्यंत सुविधा पोचवल्या जात आहेत. पुढील निवडणुकीत फोंडा मतदारसंघातून ५२ टक्के मते मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटून काम करावे.

कृषिमंत्री रवी नाईक म्हणाले, की भारत देश स्वयंभू आहे. आम्ही कुणावर निर्भर नाही. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेहलगाम दहशतवादी कृत्याचा बदला घेताना दाखवून दिले आहे. देशासाठी आणि भाजपासाठी सर्वांनी खंबीरपणे उभे रहावे.

गोव्यासाठी केंद्राकडून ३३ हजार कोटी

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, की गोव्याचा विकास झपाट्याने होत आहे. गोव्यातील रस्ते, पुलांसाठी केंद्र सरकारने ३३ हजार कोटी दिले. त्यामुळे हा चौफेर विकास झाला. भाजपाकडून देश प्रथम यावर विचार केला जातो. काँग्रेस पक्षाने राजकारणात घराणेशाही आणली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. आपण सर्वांनी विकसीत भारत घडवण्यासाठी एकजुटीने कार्य करूया.

श्यामाप्रसाद मुखर्जींचा गूढ मृत्यू!

भाजपाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीरवरून काँग्रेस नेत्यांना उघड आव्हान दिले होते. काँग्रेसी सरकारने जम्मू काश्मीरला देशापासून तोडले. त्यावेळी सरकारमध्ये सामील असलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्याला कडाडून विरोध करताना सरकारची साथ सोडली. काश्मिरात सर्वांना सोबत घेऊन जाणार असल्याचे आव्हान दिले आणि ते काश्मिरात घुसलेही. पण त्यांना व इतरांना अटक झाली. कोठडीत डांबले आणि दुसऱ्याच दिवशी कोठडीत त्यांचा गूढ मृत्यू झाला. या प्रकाराला काँग्रेसच जबाबदार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काश्मीरमधील लोकांना मोकळा श्वास घ्यायला देताना काश्मीर हा भारताचाच अविभाज्य प्रदेश असल्याचे दाखवून दिल्याचे प्रमोद सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT