Goa BJP: काँग्रेस संपली! 'त्यांनी केलेली पापं जनतेसमोर येतायेत, ती आलीही पाहिजेत'; भाजप प्रदेशाध्यक्ष

Goa Politics: नॅशनल हेराल्ड खटला हा यूपीए सरकारच्या काळात २०१२ साली सुरू झाला होता. ईडीने आता काँग्रेस नेत्यांना चौकशीसाठी बोलावले आहे.
Congress sins being exposed to public says BJP
Goa BJP State President Damu NaikDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते, त्यावेळी ती आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगतेच. काँग्रेस आपल्या नेत्यांवर राजकीय हेतूने नॅशनल हेराल्ड संबंधीची कारवाई केल्याचे सांगत मोर्चा काढत आहे.

परंतु, त्यांनी मागे जी पापे केली आहेत ती जनतेसमोर येत आहेत आणि ती आलीही पाहिजेत, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी व्यक्त केले.

येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर आणि सर्वानंद भगत उपस्थित होते. नाईक म्हणाले की, नॅशनल हेराल्ड खटला हा यूपीए सरकारच्या काळात २०१२ साली सुरू झाला होता.

ईडीने आता काँग्रेस नेत्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीला चौकशीला बोलविण्याचे, आयकर विभागाला मागील वर्षांतील देवाण-घेवाण तपासण्याचे अधिकार आहेत.

भाजपकडून याप्रकरणी एक व्हिडिओ देखील सोशल मिडियावर शेअर केला आहे.

Congress sins being exposed to public says BJP
Goa Accident: कामाला जाताना काळाने गाठले, पाडी येथे बसच्या धडकेत दोन युवक ठार

जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

काँग्रेस सर्वत्र आंदोलन करून, मोर्चे काढत आपल्यावर कशा प्रकारे अन्याय होत आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करत आहे. जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु अनेक भ्रष्टाचार कोणी केले हे जनतेला माहीत आहे.

नॅशनल हेराल्ड ही संस्था देशातील जनतेचा आवाज व्हावा, यासाठी उभारण्यात आली होती. परंतु काँग्रेसला देशातील सर्व प्रॉपर्टी आपलीच वाटते, असा टोलाही नाईक यांनी लगावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com