Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा मोठा संघटनात्मक बदल; भारती पवार प्रभारी तर अनिल अँथनी सहप्रभारी

Bharti Pawar Goa in Charge: भाजपने राज्यनिहाय प्रभारी आणि सहप्रभारींच्या नियुक्त्यांमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल केला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: भाजपने राज्यनिहाय प्रभारी आणि सहप्रभारींच्या नियुक्त्यांमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल केला आहे. त्यानुसार पक्षाच्‍या राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. भारती प्रवीण पवार यांची गोवा प्रभारी म्हणून, तर राष्ट्रीय सचिव अनिल अँथनी यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी बुधवारी या नियुक्त्या जाहीर केल्या. पुढील वर्षी गोव्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्यांना संघटनात्मकदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे.

इतर पदाधिकारी असे : पश्चिम बंगाल- लालसिंह आर्य (प्रभारी), राजेंद्र सिंह, पिंकी कुशवाह (सहप्रभारी), उत्तर प्रदेश - विनोद तावडे (प्रभारी), जगदीश पटेल, मेधा कुलकर्णी, प्रदीप वर्मा आणि अनंत ओझा (सहप्रभारी), त्रिपुरा - मृगांक देव बर्मन (प्रभारी), तेलंगण - सुनील बन्सल (प्रभारी), अभय पाटील, रेखा शर्मा (सहप्रभारी). सिक्कीम- राजू बिष्टा (प्रभारी). राजस्थान- संजय भाटिया (प्रभारी), कविता पाटीदार व कुलजीत चहल (सहप्रभारी). पंजाब- सतीश पुनिया (प्रभारी), वीरेंद्र सचदेवा, अलका गुर्जर (सहप्रभारी).

पुदुच्चेरी- के. सुरेंद्रन  (प्रभारी). उत्तराखंड आणि तमिळनाडू या राज्यांचे प्रभारीपद राम माधव यांच्याकडे दिले आहे.  मध्य प्रदेश-विप्लबकुमार देव (प्रभारी), रेखा वर्मा (सहप्रभारी). केरळम- एम. नागराजा (प्रभारी), एम. वेंकटेशन (सहप्रभारी), कर्नाटक- हरीश द्विवेदी (प्रभारी), कसम वेंकटेश्वरलू  (सहप्रभारी). झारखंड - गजेंद्र पटेल (प्रभारी), सौरभ सिंह आणि निवेदिता सिंह (सहप्रभारी). जम्मू काश्मीर- सतीश पुनिया (प्रभारी), रिना कश्यप (सहप्रभारी), हिमाचल प्रदेश- श्रीकांत शर्मा (प्रभारी), दर्शना सिंह (सहप्रभारी), गुजरात - तरुण चूघ (प्रभारी), अजय महावर आणि गोमती साई (सहप्रभारी).

सदानंद शेट तानावडे महाराष्ट्राचे सहप्रभारी

गोव्यातील राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांच्यावर महाराष्ट्राच्या सहप्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून वैजयंत जय पांडा यांची नियुक्ती करण्यात आली असून, अमित मालवीय, सदानंद शेट तानावडे आणि कमलजीत सहरावत हे सहप्रभारी असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Auction Goa: गोव्यात पुन्हा रंगणार 'आयपीएल'चा लिलाव; डिसेंबरमध्ये होणार भव्य आयोजन, 15-16 तारखेची शक्यता

Porvorim Elevated Road: अटल सेतूवरून पर्वरीत उतरण्याचा मार्ग अखेर खुला! मडगाव, वास्को, फोंडा, बांबोळीहून उत्तर गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांना मोठा दिलासा

Goa Congress: 'गोवा काँग्रेस पक्ष' खरंच आधीपासून अस्तित्वात होता का? निवडणूक आयोग सोमवारी प्रतिज्ञापत्रातून उलगडणार पक्षाच्या नावाचे गूढ

Goa Politics: 'ते' चॅटिंग मोठ्या स्क्रीनवर दाखवणार! विरोधकांच्या आरोपांना नगरनियोजनमंत्री राणेंचा इशारा; म्हणाले, "योग्य वेळी जनतेसमोर आणू"

Pakistan Airstrikes Afghanistan: पाकड्यांचा अफगाणिस्तानवर पुन्हा मोठा हवाई हल्ला! बॉम्बस्फोटांनी हादरलं कंदहार; ड्यूरंड लाईनवर दाटले युद्धाचे ढग VIDEO

SCROLL FOR NEXT