Goa Congress: 'गोवा काँग्रेस पक्ष' खरंच आधीपासून अस्तित्वात होता का? निवडणूक आयोग सोमवारी प्रतिज्ञापत्रातून उलगडणार पक्षाच्या नावाचे गूढ

Goa Congress Party Registration Dispute: ‘गोवा काँग्रेस पक्ष’ या नावाने नवीन राजकीय पक्षाच्या नोंदणीवरून सुरू असलेला विवाद लवकरच संपुष्टात येणार आहे.
Goa Congress Party Registration Dispute
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘गोवा काँग्रेस पक्ष’ या नावाने नवीन राजकीय पक्षाच्या नोंदणीवरून सुरू असलेला विवाद लवकरच संपुष्टात येणार आहे. असा कोणताही पक्ष यापूर्वी नोंदणीकृत होता का किंवा आहे का, याबाबत सोमवारी २८ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोग न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे.

प्रस्तावित ‘गोवा काँग्रेस पक्ष’ या नावाच्या नोंदणीला इंडियन नॅशनल काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. हे नाव मूळ काँग्रेस पक्षाच्या नावाशी साम्य असणारे असून यामुळे मतदारांमध्ये मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो, असा दावा मूळ काँग्रेसने केला आहे.

Goa Congress Party Registration Dispute
Goa Politics: 'ते' चॅटिंग मोठ्या स्क्रीनवर दाखवणार! विरोधकांच्या आरोपांना नगरनियोजनमंत्री राणेंचा इशारा; म्हणाले, "योग्य वेळी जनतेसमोर आणू"

निवडणूक आयोगाने न्यायालयाला माहिती दिली की, नोंदणीसाठीचा अर्ज प्राप्त झाला असून त्याची छाननी सुरू आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून अर्जदारांना प्राथमिक तपासणी सूची (चेकलिस्ट) जारी करून कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे आणि ठराव मागविले होते. सध्या या कागदपत्रांची पडताळणी सुरू असून, पक्षाच्या राज्यातील अस्तित्वाबाबत अतिरिक्त पुरावे मागविले जाऊ शकतात.

लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम २९-अ अंतर्गत निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नोंदणी प्रक्रियेपूर्वी आलेले आक्षेप निकाली काढणे आयोगावर बंधनकारक आहे, असा युक्तिवाद काँग्रेसने केला. तसेच, अस्तित्वात असलेल्या पक्षाशी साधर्म्य असणारे नाव मतदारांत भ्रम निर्माण करू शकते, या मुद्द्याच्या पुष्टीसाठी मद्रास उच्च न्यायालयातील खटल्याच्या निकालाचा दाखला न्यायालयात देण्यात आला.

Goa Congress Party Registration Dispute
Goa Electoral Roll: मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी पात्र म्हटले, पण अंतिम यादीत नावच नाही! गोव्यातील 97 प्रकरणांमुळे निवडणूक यादीच्या तांत्रिक नियंत्रणावर चर्चा

अन्यथा अर्जावर विचार नाही!

न्यायालयाने निवडणूक आयोगाला आपल्या नोंदणी पुस्तकाची तपासणी करून ‘गोवा काँग्रेस पक्ष’ या नावाने कोणताही पक्ष नोंदणीकृत आहे किंवा नाही, हे स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रतिज्ञापत्र दाखल केल्यावर न्यायालय आक्षेपांवर सुनावणी घेऊन कायद्यानुसार नोंदणी प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाला पुढील निर्देश देईल. या नावाने पक्ष आधीच नोंदणीकृत असल्यास अर्जावर विचार करण्याचा प्रश्न उद्भवणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com