Goa Politics: 'ते' चॅटिंग मोठ्या स्क्रीनवर दाखवणार! विरोधकांच्या आरोपांना नगरनियोजनमंत्री राणेंचा इशारा; म्हणाले, "योग्य वेळी जनतेसमोर आणू"

Vishwajit Rane Opposition Statement: विधानसभा निवडणूक जवळ येत असल्यानेच विरोधक सरकारविरोधात विधाने करत आहेत.
Vishwajit Rane Opposition Statement
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: विधानसभा निवडणूक जवळ येत असल्यानेच विरोधक सरकारविरोधात विधाने करत आहेत; परंतु त्यांच्यातील गोवा राखण्याची भाषा करणाऱ्यांपैकी अनेकांचे चॅटिंग माझ्या मोबाईलवर असून योग्यवेळी मोठ्या स्क्रिनवर गोव्याच्या जनतेला दाखविण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नगरनियोजनमंत्री विश्‍वजीत राणे यांनी आज दिला.

पणजी येथे प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. राणे म्हणाले, की आज जे विरोधक माझ्याविरोधात बोलत आहेत, त्यांच्या जमिनी एनडीए क्षेत्रात आल्या असतील, कदाचित ती भातशेती किंवा इतर कोणत्या प्रकारची जमीन असू शकते. एनडीए जमिनीत बांधकामाची परवानगी नाही आणि ती आम्ही देणारही नसल्याचे राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Vishwajit Rane Opposition Statement
Goa Electoral Roll: मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी पात्र म्हटले, पण अंतिम यादीत नावच नाही! गोव्यातील 97 प्रकरणांमुळे निवडणूक यादीच्या तांत्रिक नियंत्रणावर चर्चा

गेल्या साडेचार वर्षांत ‘प्रादेशिक आराखडा २०२१’नुसार राज्यातील केवळ १४ लाख चौरस मीटर म्हणजेच ०.२९६ टक्के जमीन रूपांतरित केली आहे, तर २० कोटी चौरस मीटर जमिनीचे एनडीए अविकास क्षेत्र घोषित करण्यात आले आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

जमिनी एनडीए क्षेत्रात आल्यानेच आगपाखड

नवरात्रोत्सवात महत्त्वपूर्ण घोषणा

आज केंद्रात भाजपचे सरकार आहे. देशाला नरेंद्र मोदी यांच्यासारखे भक्कम नेतृत्व मिळाले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे नवरात्रोत्सव काळात महिला आणि युवकांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करणार आहेत, असेही मंत्री राणे यांनी यावेळी सांगितले.

आश्‍वासने देणे नव्हे, पूर्ण करण्याची क्षमता हवी

विरोधी पक्षातील किती नेते तेथे टिकतात, हे मागील १५ वर्षांत जनतेने पाहिले आहे. आज जे विरोधक युती करण्याची भाषा करत आहेत, तेच उद्या एका पायावर भाजपमध्ये येण्यासाठी तयार असतील. केवळ जाहीरनाम्यात आश्‍वासने दिली म्हणून होत नाही, तर ती पूर्ण करण्याची क्षमता असावी लागते, अशी कोपरखळीही मंत्री राणे यांनी विरोधकांना हाणली.

Vishwajit Rane Opposition Statement
Goa Building Rule: गोव्यात अवघ्या 3 मीटर रस्त्यावर बांधकामांना परवानगी? 2023च्या सुधारित नियमांना न्यायालयात आव्हान; सरकारला नोटीस

मागील वीस वर्षे मला सत्तरीची जनता निवडून देत आहे. माझे वडील प्रतापसिंह राणे यांनाही ५० वर्षे निवडून दिले. आम्ही जनतेची सेवा करतो, म्हणूनच जनता आम्हाला निवडून देते. आम्ही जे काम केले आहे, ते भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता जनतेसमोर ठेवेल. येत्या निवडणुकीत भाजपच सत्तेवर येईल.

- विश्‍वजीत राणे, नगरनियोजन मंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com