Nitin Nabin Goa Visit Dainik Gomantak
गोवा

Nitin Nabin Goa Visit: भाजप नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष 'नितीन नवीन' येणार गोवा दौऱ्यावर, गाभा समितीची घेणार बैठक

Nitin Nabin In Goa: नवीन हे भाजपच्या गाभा समितीची बैठक घेणार असून मंत्री, आमदार, पक्ष पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते तसेच मंडळ अध्यक्षांशी विविध स्तरांवर सखोल चर्चा करणार आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हे ३० व ३१ जानेवारी असे दोन दिवस गोवा दौऱ्यावर येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या दौऱ्यात नवीन हे भाजपच्या गाभा समितीची बैठक घेणार असून मंत्री, आमदार, पक्ष पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते तसेच मंडळ अध्यक्षांशी विविध स्तरांवर सखोल चर्चा करणार आहेत.

गोव्यात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करणे आणि आगामी निवडणुकांसाठी ठोस रणनीतीआखणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश असल्याचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले. बूथ पातळीपासून राज्य पातळीपर्यंत संघटनात्मक बांधणी कशी अधिक प्रभावी करता येईल, याचा सविस्तर आढावा नितीन नवीन घेणार आहेत.

यामध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह, संघटनात्मक शिस्त, संपर्क अभियान आणि मतदारांशी थेट संवाद या बाबींवर विशेष भर दिला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी भारतीय जनता युवा मोर्चामध्ये कार्यरत असताना नितीन नवीन यांच्यासोबत जवळून काम केले आहे.

या तिघांमधील जुना संघटनात्मक अनुभव व समन्वय गोवा भाजपसाठी लाभदायक ठरेल, असा विश्वास पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

नितीन नवीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली नियुक्ती गोवा भाजपसाठी लाभदायक ठरणार असल्याचे मत राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केले आहे. केंद्र आणि राज्य नेतृत्वातील सुसंवाद, कार्यकर्त्यांना दिशा देणारे मार्गदर्शन आणि स्पष्ट राजकीय रणनीती यामुळे गोव्यात भाजपची संघटनात्मक पकड अधिक मजबूत होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे हा दौरा केवळ औपचारिक न राहता, भाजपच्या पुढील वाटचालीसाठी दिशादर्शक ठरू शकणारा आहे.

दौऱ्याची ठळक वैशिष्ट्ये

३० व ३१ जानेवारी असे दोन दिवस गाभा समिती, मंत्री, आमदार व पदाधिकाऱ्यांसोबत बैठका. बूथ पातळीवरील संघटनात्मक आढावा. कार्यकर्ता संवाद व संपर्क अभियानावर भर. २०२७ च्या विधानसभा निवडणूक रणनीतीवर चर्चा.

नेतृत्वातील समन्वय लाभदायक

नितीन नवीन, डॉ. प्रमोद सावंत व दामू नाईक यांचा जुना संघटनात्मक अनुभव. युवा मोर्चातील सहकार्याचा पक्षाला लाभ. केंद्र व राज्य नेतृत्वातील सुसंवाद. संघटन उभारणीसाठी समान दृष्टी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ishan Kishan: "मी पुन्हा तशीच फलंदाजी करू शकतो की नाही"? ईशान किशनने उलगडले रहस्य; म्हणाला, 'मी स्वतःलाच....'

Deltin Casino: डेल्‍टीन कॅसिनोचा मार्ग होणार मोकळा! धारगळसह इतर गावांतील 36 हेक्‍टर जमीन ‘काडा’तून वगळणार

Goa ST Commissioner: 7 महिन्यांपासून ‘एसटी आयुक्त’चे पद रिक्‍त! 213 दावे प्रलंबित; नियुक्‍तीची शिफारस करणारी फाईल सरकारकडे

Panaji Riverfront: पणजीसाठी नवे ‘रिव्हरफ्रंट’! मांडवी काठावर शहरातील निसर्गरम्य खुले स्थळ

Goa Police: पोलिसांत अधीक्षकांची ‘भाऊगर्दी’! मंजूर पदांपेक्षा वाढल्या बढत्या; अतिरिक्त कार्यभार कमी करण्याचे कारण पुढे

SCROLL FOR NEXT