Arvind Kejriwal And Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: ‘आप’मुळे भाजपची झाली गोची; वाचा सविस्तर

कॉंग्रेससारख्या (Congress) कमकुवत आणि लिलाव करणाऱ्या विरोधी पक्षांची भाजपला (BJP) सवय असल्याचे आपकडुन (AAP) बोलले जाते आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: ‘आप’च्या (Goa AAP) शांततावादी निदर्शकांवर केलेल्या हिंसाचाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, सत्ताधाऱ्यांबद्दल जनतेच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नंतर भाजपने (BJP) नुवेच्या घटनेतील तथ्य चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केल्याची टीका आम आदमी पक्षातर्फे करण्यात आली. (BJP is facing a big problem due to AAP in Goa)

मंगळवारी पक्षाच्या मुख्यालयातील पत्रकार परिषदेत ‘आप’चे नेते वाल्मीकि नाईक आणि कॅप्टन वेंझी व्हिएगस म्हणाले की, हिंसाचाराचे थेट कारण म्हणजे भाजपच्या राजकीय निराशेचा परिणाम होता. त्यांना हे समजले होते की, इतर विरोधी पक्षांप्रमाणे ‘आप’ला भीती घातली जाऊ शकत नाही.

‘आप’च्या कार्यकर्त्यांनी आमदार निवासस्थानी शांततेत अडथळा आणल्याचा भाजपचा आरोप व्हिएगस यांनी नाकारला. उलट ‘आप’ने केक देऊन ‘गोड राजकारण’ केले, असे व्हिएगस म्हणाले.

‘आप’ने विश्वासघात करण्याचा मुद्दा उपस्थित केल्यावर काही आमदारांना लाज वाटली आणि त्यांनी केक नाकारला. इतरांना केक स्वीकारण्यात कोणतीही लाज वाटली नाही. व्हिएगस म्हणाले, नुवेत आमदार डिसा यांच्या समर्थकांनी हिंसक प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘आप’च्या महिला नेत्यांवरही त्यांनी हल्ला केला.

दुसऱ्या दिवशी ‘आप’ने आमदारांकडून माफीची मागणी करण्यासाठी शांततापूर्ण निषेध मोर्चाचे नेतृत्व केले, तेव्हा आमदार समर्थकांनी त्याच वर्तनाची पुनरावृत्ती केली आणि घाणेरडी भाषा वापरली. आमच्यावर वस्तू फेकल्या आणि पोलिसांच्या देखत निदर्शकांना मारहाणही केली.

...म्हणून भाजप सरकारला उघडे पाडू

वाल्मिकी नाईक म्हणाले की, कॉंग्रेससारख्या कमकुवत आणि लिलाव करणाऱ्या विरोधी पक्षांची भाजपला सवय आहे. म्हणूनच ‘आप’सारख्या पक्षाला तोंड देताना त्यांनी हिंसक प्रतिक्रिया दिली. नुवेतील सरकार पुरस्कृत हिंसाचाराने हे सिद्ध केले आहे की, गोव्यात भाजपची मुक्त धाव आता संपली आहे. मात्र, भाजपच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. आमचे कार्यकर्ते शांततेत भाजपची लाठी सहन करतील किंवा तुरुंगवास भोगतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodybuilder Roya Karimi: 14व्या वर्षी लग्न, 15व्या वर्षी आई... 'तालिबानी' बंधनं झुगारुन 'रोया करीमी' बनली टॉपची बॉडीबिल्डर; आज जगभर होतेय चर्चा

AUS vs ENG: पहिल्याच सामन्यात गरमागरमी, लाबुशेन-कार्स मैदानावर भिडले; बाचाबाचीचा व्हिडिओ तूफान व्हायरल

Earthquake in BAN vs IRE 2nd Test: बॉलिंग-बॅटिंग सोडून 'पळापळ'! भूकंपानं मैदान हादरलं, खेळाडूंंमध्ये भीतीचं वातावरण

Pakistan Factory Blast: पाकिस्तानात फॅक्टरीत भीषण स्फोट, 15 ठार, 7 जखमी; फॅक्टरीचा मालक फरार, मॅनेजरला अटक VIDEO

VIDEO: ना भरजरी साडी ना मेकअप! साऊथची 'ब्युटी क्वीन' साई पल्लवीचा 'IFFI' मध्येही पारंपरिक लूक, अभिनेत्रीच्या सौंदर्याची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT