PM Narendra Modi Visit to Goa: Madgaon KTC Bus Stand Closed from 1st to 8th February  Dainik Gomantak
गोवा

PM Narendra Modi: दक्षिण गोवा जागेसाठी भाजपची ताकद पणाला!

PM Narendra Modi: 6 रोजी शक्तिप्रदर्शन : मोदींच्या सभेद्वारे प्रचाराचे बिगुल

दैनिक गोमन्तक

PM Narendra Modi: मागील लोकसभा निवडणुकीत हातातून निसटलेला दक्षिण गोवा मतदारसंघ यावेळी कोणत्‍याही परिस्‍थितीत जिंकायचाच असा निर्धार केलेल्या भाजपने ६ फेब्रुवारी रोजी मडगावात होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारी कार्यक्रमाचा पुरेपूर उपयोग करून घेण्याचे ठरविले आहे.

या कार्यक्रमासाठी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रत्येक मतदारसंघातून मडगावात पोचतील असे नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेसुद्धा याच कार्यक्रमात गेल्‍या दहा वर्षात राज्य सरकारने जनकल्याणासाठी कोणकोणती कामे केली याचा लेखाजोखा सादर करणार आहेत.

एकंदरीत लोकसभेसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यास या कार्यक्रमाद्वारेच भाजप प्रारंभ करणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या 6 फेब्रुवारी रोजीच्या दौऱ्याच्या निमित्ताने भाजप आपल्या दक्षिण दिग्विजयासाठी प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे.

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपने गेल्या वर्षभरात संघटनात्मक बांधणीवर विशेष लक्ष दिले आहे. हे काम व्यवस्थित व्हावे यासाठी गोव्याशी संबंधित नसलेल्या केंद्रीय मंत्र्यांकडे त्याची जबाबदारी देण्यात आली होती.

भारतीय ऊर्जा सप्ताह उद्‌घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान गोव्यात येणार असले तरी ‘विकसित भारत’ या यात्रेचे औचित्‍य साधून मडगावात जाहीर कार्यक्रम सरकारच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे. यामुळेच दक्षिण गोव्यातील लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा बिगुल या कार्यक्रमाच्या निमित्ताने फुंकला जाण्‍याची तयारी भाजपने चालविली आहे.

कमी मते मिळालेल्‍या मतदारसंघांवर विशेष लक्ष

लोकसभेच्या मागील निवडणुकीत ज्या-ज्या विधानसभा मतदारसंघांत भाजपला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत, अशा मतदारसंघांवर भाजपने या खेपेला विशेष लक्ष दिले आहे. अशा मतदारसंघांत पंधरवड्यातून दोन-तीन वेळा केंद्रीय मंत्री जाऊन संघटनात्मक बांधणीचा आढावा घेत होते. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचा यात समावेश होतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 6 फेब्रुवारीच्या गोवा दौऱ्यात ‘विकसित भारत, विकसित गोवा’ रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच मागील दहा वर्षांच्या विकासकामांची माहिती दिली जाईल. सरकारी योजनांची योग्य अंमलबजावणी करण्यात यश मिळविलेल्या अधिकाऱ्यांना गौरविण्यात येणार आहे. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मुंबई इंडियन्सने शेअर केला चिमुकल्यांनी बनवलेल्या किल्ल्यांचा व्हिडिओ, फॅन्स म्हणाले, "म्हणूनच हा संघ आमच्यासाठी खास..."

Rama Kankonkar Attack: 'बेल' नाही, 'जेल'च! जेनिटोचा जामीन न्यायालयानं फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला

Gujarat Violence: धार्मिक कार्यक्रमावरून गुजरातमध्ये हिंसाचार; घरांची तोडफोड, 30 वाहने जाळली, 10 जखमी

भुसावळ ते गोवा थेट रेल्वे सेवेची मागणी! मुंबईचा त्रास टळणार; हजारो कोकणवासीयांचा वेळ आणि पैसा वाचणार

Rohit Sharma Record: सचिन, कोहलीला जे जमलं नाही, ते रोहित ऑस्ट्रेलिया मालिकेत करणार! फक्त 'इतक्या' षटकारांची गरज, विश्वविक्रम रचणार

SCROLL FOR NEXT