Panaji Municipal Election Dainik Gomantak
गोवा

Panaji Municipal Election: विजयोत्सवाने राजधानी दुमदुमली! सलग 7 तास मिरवणूक; बाबूश पॅनेलवर शुभेच्छांचा वर्षाव VIDEO

Panaji Municipal Election 2026: ‘डीजे’च्या दणदणाटात ही मिरवणूक कार्यालयात पोहोचल्यानंतर तेथे मुख्यमंत्री सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी विजयी उमेदवारांचे आणि मंत्री मोन्सेरात यांचे अभिनंदन केले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पणजी महानगरपालिकेत दमदारपणे पुन्हा सत्ता प्राप्त केलेल्या भाजप प्रणित मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या अध्यक्षतेखालील ‘टुगेदर फॉर प्रोग्रेसिव्ह पणजी’च्या विजयी उमेदवारांची सुमारे सात तास मिरवणूक चालली. रायबंदर परिसरात या मिरवणुकीची सांगता झाली.

तीसपैकी २८ जागांवर दणदणीत विजय मिळविलेल्या मंत्री मोन्सेरात यांच्या अध्यक्षेतेखालील विजयी पॅनलचे सर्व नगरेसवक आमदारांच्या मिरामार येथील कार्यालयात दुपारी पोहोचल्यानंतर त्याठिकाणी फटाक्यांची आणि रंगाची उधळण करीत विजयोत्सव साजरा केला. त्यानंतर काही वेळाने याठिकाणावरून मंत्री मोन्सेरात यांनी चालत मिरवणुकीस सुरुवात केली आणि ती पणजी कार्यालयावर पोहोचली.

‘डीजे’च्या दणदणाटात ही मिरवणूक कार्यालयात पोहोचल्यानंतर तेथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी विजयी उमेदवारांचे आणि मंत्री मोन्सेरात यांचे अभिनंदन केले. या सोहळ्यानंतर वाहनातून मंत्री मोन्सेरात यांनी सर्व नगरसेवकांना घेऊन ही मिरवणूक शहरातून सर्व प्रभागातून काढली. रात्री दहानंतर रायबंदर येथे पोहोचली.

चार माजी महापौर पुन्हा मनपात

रोहित मोन्‍सेरात (विद्यमान महापौर) व विठ्ठल चोपडेकर, शुभम चोडणकर, कॅरोलिना पो, उदय मडकईकर हे चार माजी महापौर भाजप-बाबूशप्रणीत प्रोग्रेसिव्‍ह पॅनेलमधून विजयी झाले. तर उत्‍पल गटाच्‍या सुरेंद्र फुर्तादो (माजी महापौर) यांचा धक्‍कादायक पराभव झाला.

प्रभाग ७, १७ आणि २९ मध्ये ‘आमी पणजेकार’

सांताक्रूझ येथील पठारावरील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. दोन्ही पॅनेलचे उमेदवार आणि त्यांचे समर्थक स्टेडियम परिसरात जमले होते. सुरुवातीला १ ते ८ प्रभागांतील मतमोजणी झाली. या फेरीत बाबूश गटाचे सात उमेदवार विजयी झाले, तर प्रभाग क्रमांक ७ मध्ये ‘आमी पणजेकार’च्या उमेदवाराने विजय मिळविला. त्यानंतरच्या फेऱ्यांमध्येही बाबूश गटाचा विजयाचा सिलसिला कायम राहिला. मात्र प्रभाग क्रमांक १७ आणि २९ मध्ये ‘आमी पणजेकार’च्या उमेदवारांनी बाजी मारली.

सातजण मूळ भाजपचे

बाबूश मोन्सेरात हे कोणत्याही पक्षात असले तरी महानगरपालिका निवडणुकीत आपल्या विचारांचे आपल्याला हवा तो उमेदवार रिंगणात उतरवण्यात प्राधान्य देतात. भाजपात आले तरी त्यांचा पणजी व ताळगावबाबत पक्षात स्वतःची वेगळी जागा निर्माण केली आहे. आपल्याला विचारात घेतल्याशिवाय दोन्ही मतदारसंघात पक्षाचे पान हलणार नाही, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

पणजीतही त्यांनी मूळ भाजपच्या मोजक्याच उमेदवारांना उमेदवारी दिल्याचे दिसून येते. त्यात विचार केला तर प्रभाग ५ मध्ये किशोर शास्त्री, प्रभाग २० मध्ये शुभम चोडणकर, प्रभाग २२ मध्ये दीक्षा माईणकर, प्रभाग २३ मध्ये विद्या गडकर, प्रभाग २६ मध्ये वसंत आगशीकर आणि प्रभाग २८ मध्ये रूपेश हळर्णकर व प्रभाग २९ लिब्रेटा मेंडेस इ आचारी यांचा समावेश आहे. हे सर्वजण मनोहर पर्रीकर यांच्या काळात हे सर्वजण भाजपचे कट्टर समर्थक राहिले आहेत आणि आता ते विजयीही झालेले आहेत.

भाजप सरकार, बाबूशवरील प्रेमामुळेच यश!

केंद्र, राज्‍यातील भाजप सरकार आणि पणजीतील जनतेचे मंत्री तथा भाजप आमदार बाबूश मोन्‍सेरात यांच्‍यावर असलेले प्रेम यांमुळेच पणजी महानगरपालिका (मनपा) निवडणुकीत भाजप पुरस्‍कृत पॅनलला ३० पैकी तब्‍बल २७ जागा मिळाल्‍या आहेत. याआधी आम्‍ही आगामी विधानसभेत २०२७ मध्‍ये २७ असा नारा दिलेला होता. आता मनपात आमच्‍या २७ जागा आलेल्‍या आहेत. त्‍यामुळे विधानसभा निवडणुकीत ३० जागा जिंकून आणू, असा निर्धार भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी केला.

मनपा निवडणुकीत विजयी झालेल्‍या २७ नवनिर्वाचित नगरसेवकांच्‍या सत्‍कारासाठी प्रदेश भाजपतर्फे पणजीतील भाजप कार्यालयासमोर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री बाबूश मोन्‍सेरात, माजी उपमुख्‍यमंत्री बाबू कवळेकर यांच्‍यासह सर्व विजयी नगरसेवक यावेळी उपस्‍थित होते.

काहीच महिन्‍यांपूर्वी झालेल्‍या जिल्‍हा पंचायत निवडणुकीतही भाजपने घवघवीत यश मिळवले. दोन्‍ही जिल्‍हा पंचायतींवर भाजपचा झेंडा फडकावला. त्‍यानंतर आता मनपाही भाजपने जिंकल्‍याने कार्यकर्त्यांचा उत्‍साह आणखी वाढेल. त्‍याचा आगामी पालिका व विधानसभा निवडणुकीत पक्षाला लाभ होईल, असा विश्‍‍वासही नाईक यांनी व्‍यक्त केला.

दरम्‍यान, यावेळी विजयी नगरसेवकांना दामू नाईक व मुख्‍यमंत्र्यांच्‍या हस्‍ते गौरवण्‍यात आले. त्‍यानंतर पणजीत विजयी रॅलीही काढली. या रॅलीस पणजीसह ताळगाव, सांताक्रूजमधील भाजप कार्यकर्ते संख्‍येने उपस्‍थित होते.

युतिका सर्वात युवा नगरसेविका

महानगरपालिकेच्या या निवडणुकीत सर्वात युवा नगरसेविका असणार आहे, ती प्रभाग १ मधील. या प्रभागात महिला राखीव असलेल्या ठिकाणी मंत्री बाबूश मोन्सेरात गटाने उमेदवारी दिलेल्या युतिका जांबावलीकर या २१ वर्षीय युवतीने विजय मिळविला. तिने या प्रभागात ३९६ मते मिळविली, तिला आव्हान राहिले ते अपक्ष उमेदवार दामिनी कुंक्कळ्येकर यांचे. याठिकाणी ‘आमी पणजेकार' पॅनलच्या रोशन मार्टिन्स या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. त्यांना १०२ मते मिळाली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "चिमुकल्यांचे हात-पाय बांधून अमानुष छळ!" डेकेअर सेंटरचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी 13 जणांना ठोकल्या बेड्या

Goa Professional League 2026: स्पोर्टिंग क्लब द गोवाचा 'विराट' विजय! डॉयल अल्विसची शानदार हॅटट्रिक अन् प्रोफेशनल लीगच्या जेतेपदावर तिसऱ्यांदा कोरलं नाव

Goa River Drowning Cases: गोव्यात बेफिकिरीमुळेच बुडण्याच्या घटनांमध्‍ये होतेय वाढ! सत्तरी तालुक्‍यातही चिंता; मद्यसेवन, सुरक्षेअभावी नद्या बनल्‍या धोकादायक

Harmal Wedding Theft : वीज पुरवठा थांबवून मारला डल्ला, लग्नसोहळ्यातील लुटीचा पडद्याआडून खेळ तपासाचे आव्हान

Bicholim Class 11 Admissions : अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ, विज्ञान शाखेसाठी चुरस; ‘ऑनलाईन’ प्रवेश प्रक्रिया सुरू

SCROLL FOR NEXT