Bits Pilani Goa Dainik Gomantak
गोवा

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’बाबत धक्कादायक माहिती समोर! विद्यार्थ्यांना मिळायच्या सिगारेट्स; ‘कुरियर बॉय’ची तपासणी सुरु

Bits Pilani Goa Death: विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने खाद्यपदार्थ देण्‍यासाठी येणाऱ्या ‘कुरियर बॉय’ची तपासणी करण्‍यात येत आहे, अशी माहिती बिट्स पिलानीच्‍या वरिष्‍ठ अधिकाऱ्याने दिली.

Sameer Panditrao

पणजी: गेल्‍या नऊ महिन्‍यांत पाच विद्यार्थ्यांच्‍या मृत्‍यूमुळे देशभरात गाजत असलेल्‍या गोव्‍यातील ‘बिट्स पिलानी’ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत ‘कुरियर बॉय’च्‍या माध्‍यमातून काही महिन्‍यांपूर्वी सिगारेट पोहोचत होते. याची माहिती मिळाल्‍यापासून तेथील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने खाद्यपदार्थ देण्‍यासाठी येणाऱ्या ‘कुरियर बॉय’ची तपासणी करण्‍यात येत आहे, अशी माहिती बिट्स पिलानीच्‍या एका वरिष्‍ठ अधिकाऱ्याने ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

चार विद्यार्थ्यांच्‍या मृत्‍यूमुळे बिट्स पिलानीचे नाव देशभरात गाजत असतानाच काही दिवसांपूर्वी ऋषी नायर या २० वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह त्‍याच्‍या खोलीत आढळून आल्‍याने बिट्स पिलानी पुन्‍हा एकदा चर्चेत आले. काही महिन्‍यांपासून तणावाखाली गेलेल्‍या ऋषी नायरचा झोपेत उलटी आल्‍याने गुदमरून मृत्‍यू झाल्‍याचे त्‍याच्‍या शवचिकित्‍सा अहवालातून समोर आलेली आहे.

परंतु मानसिक तणावातून आत्तापर्यंत पाच विद्यार्थ्यांचे मृत्‍यू झाल्‍याने या मृत्‍यूंमागे ड्रग्‍सचा संदर्भही जोडण्‍यास सुरुवात झालेली आहे. या पार्श्वभूमीवर, बिट्स पिलानीच्‍या कॅम्‍पसमध्‍ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना याआधी काही कंपन्‍यांच्‍या ‘कुरियर बॉय’मार्फत सिगारेट पोहोच केले जात होते.

याची माहिती मिळताच प्रशासनाने ‘कुरियर बॉय’ना सुरुवातीला तंबी दिली, परंतु त्‍यांच्‍याकडून असे प्रकार वारंवार घडल्‍यानंतर त्‍यांच्‍याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल करण्‍यात आलेली होती, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

केवळ बॅगेचीच होते तपासणी

बिट्स पिलानीच्‍या कॅम्‍पसमधील विद्यार्थ्यांपर्यंत ‘कुरियर बॉय’मार्फत ड्रग्‍स पोहोचवल्‍याचे उदाहरण आत्तापर्यंत समोर आलेले नाही, परंतु खाद्यपदार्थ देण्‍यासाठी येणाऱ्या ‘कुरियर बॉय’कडे असलेल्‍या बॅगेची तपासणी करण्‍यात येते. पण खाद्यपदार्थांच्‍या डब्याची तपासणी केली जात नसल्‍याने हा संशयही नाकारता येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA 2nd Test: गुवाहाटी कसोटीपूर्वी मोठा धक्का, शुभमन गिलनंतर आणखी 3 खेळाडू रुग्णालयात दाखल; कारण काय?

Temba Bavuma Record: बावुमाचे 'मिशन वर्ल्ड रेकॉर्ड'! गुवाहाटीत भारताला हरवून इतिहास रचण्याची संधी, जे कुणालाच नाही जमलं ते करुन दाखवणार

नावेलीत मांस दुकानात गायीचे कापलेले शिर आढळल्याने खळबळ, दुकानदाराला अटक, नंतर जामिनावर सुटका; काय नेमकं प्रकरण?

लहानग्या 'अमूर फाल्कन'ची थक्क करणारी भरारी! एका दिवसात 1000 किमी प्रवास करुन रचला नवा कीर्तिमान; वन्यजीव संशोधकही हैराण

Dacoity Case Goa: तोंडावर मास्क, हातात शस्त्र, घरातल्यांना केली जीवघेणी मारहाण; बायणात सव्वाकोटींचा ऐवज घेऊन 8 दरोडेखोर पसार

SCROLL FOR NEXT